भुसावळ : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ येथे शहर काँग्रेस कमिटीतर्फे मंगळवारी सायकल रॅली काढण्यात आली.
प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जोरदार घोषणाबाजी करून केंद्र सरकारच्या विरोधात सायकल रॅली काढण्यात आली.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्त्वात शहराध्यक्ष रवींद्र निकम व जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष मुन्वर खान, माजी आमदार नीळकंठ फालक, प्रदेश संयोजक भगवान मेढे, प्रदेश महासचिव मुक्ती हारुन यांनी इंधन दरवाढीविरोधात घोषणाबाजी केली.
यावेळी शहर उपाध्यक्ष संतोष साळवे, विलास खरात, मागासवर्गीय विभाग अध्यक्ष सुनील जवरे, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष सलीम गवळी, महिला शहर अध्यक्ष यास्मीन बी. शेख तन्वीर, राम अवतार, रघुनाथ चौधरी, ज्येष्ठ कार्यकर्ता जे. बी. कोटेजा, सागर कुरेशी, दुर्गाबाई सोनवणे, महिला जिल्हा उपाध्यक्षा राणी खरात, बाळू सपकाळे, विनोद पवार, इमान ठेकेदार, हमीद शेख, शहर उपाध्यक्ष सुजाता सपकाळे, हमीदा गवळी, रमजान खाटीक, इसाक चौधरी, जानी गवळी, वसीम शेख, शाहनवाज सलीम गवळी, नाशिरखान, रशीद कुरेशी, शरीफ शहा, सुनील रायमळे, भीमराव वाघ, मुकुंद टेलर, शहर सरचिटणीस शैलेश अहिरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.