शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दररोज सायकल चालवा आणि तंदुरुस्त रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 21:51 IST

जळगाव : सायकल हा सोपा आणि शरिराच्या सर्व भागांची हालचाल करणारा व्यायाम आहे. नियमित सायकल चालविण्याने सकाळी एक नवी ...

जळगाव : सायकल हा सोपा आणि शरिराच्या सर्व भागांची हालचाल करणारा व्यायाम आहे. नियमित सायकल चालविण्याने सकाळी एक नवी ऊर्जा मिळते. त्यामुळे आरोग्यदायी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी दररोज सायकल चालवा आणि तंदुरुस्त रहा, असे आवाहन शहरातील नियमित सायकल चालविणाऱ्या नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.गेल्या आठवडाभरापासून थंडीचे प्रमाण वाढल्याने शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांवर सायकल चालविणाऱ्यांची देखील गर्दी दिसून येत आहे. अनेक नागरिक हिवाळ्यात सायकलिंगचा आनंद लुटतात. शहरातील शिरसोली रस्ता, औरंगाबाद रस्ता व नशिराबाद रस्त्यावर सकाळपासूनच नागरिक सायकल चालवित आहेत.शारिरीक स्वास्थासाठी हिवाळा हा ऋतू महत्वाचा मानला जात असल्याने अनेक युवकांसह वयोवृद्ध नागरिकदेखील आवडीने सायकल चालवित असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे साध्या सायकलपेक्षा अनेकांकडे रेंजर सायकल दिसून येत आहे. ही सायकल वजनाने हलकी आणि चालवायलाही तरल असल्याने यामुळे लवकर थकत नसल्याचे तरुणांनी सांगितले. कॉलेजला जाण्यासाठी दररोज सायकल चालविणे होतेच, मात्र हिवाळ््यात सकाळी-सकाळी सायकल चालविणे, खूप फायदेशीर व्यायाम असल्यामुळे पंधरा दिवसापासून दररोज २० किलोमीटर सायकल चालवित असल्याचे योगेश पाटील या युवकाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सायकल चालविण्याचे फायदे-नियमित सायकल चालविल्याने शरिराच्या सर्व अवयवांची हालचाल होऊन, शरीर तंदुरुस्त राहते.- मानदुखी, पाठदुखीचा त्रास दूर होतो.-सकाळी-सकाळी सायकल चालविल्याने ताणतणाव दूर होऊन, ताजेतवाने वाटते.-शरिरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो.-मधुमेह, संधिवात, लठ्ठपणा या आजारांवर नियंत्रण मिळविता येते.-सर्वांत महत्वाचे म्हणजे वजन कमी करण्यासाठी सायकलिंग खूप फायदेशीर आहे.-नियमित सायकल चालविल्याने शरिरातील स्नायू बळकट होऊन, पायांची कार्यक्षमताही वाढते.

टॅग्स :Medicalवैद्यकीयJalgaonजळगाव