शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

चाळीसगावला वीज ग्राहक मेळाव्यात तक्रारींचा 'करंट'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 12:22 AM

आमदारांचा निर्धार : वीज आणि पाण्यासाठी करणार मंत्रालयासमोर आंदोलन

चाळीसगाव : आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून गुरुवारी दुपारी राजपूत लोकमंगल कार्यालयात झालेल्या वीज ग्राहकांच्या मेळाव्यात तक्रारींचा पाऊस पडला. अ.भा. ग्राहक पंचायत आणि वीज वितरण कंपनीच्या संयुक्त विद्यमाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शेतक-यांना शेतीसाठी पाणी आणि वीज मिळावी. यासाठी आपण कटिबद्ध आहोत. सद्य:स्थितीत तालुक्यात पाण्याची उपलब्धता चांगली असली तरी शासनाने वीज कनेक्शन खंडीत केल्याने बळीराजा चिंतातूर आहे. शेतक-यांसाठी प्रसंगी मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात दिला. मेळाव्याला वीज ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांसमोरच ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले.मेळाव्याला वसंतराव चंदात्रे, कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे, के बी साळुंखे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा सुनील निकम, पं. स. गटनेते संजय भास्करराव पाटील, जि प सदस्य भाऊसाहेब जाधव, दिनेश बोरसे, सुभाष पाटील, पियुष साळुंखे, ग्राहक पंचायत अध्यक्ष रमेश सोनवणे, रावसाहेब पाटील, नगरसेविका संगीता गवळी, राजेंद्र चौधरी, भास्कर पाटील, मानसिंग राजपूत, नितीन पाटील, डॉ. अर्चना पाटील, बाळासाहेब राऊत, किसनराव जोर्वेकर, रविंद्र केदारसिंग पाटील, धनंजय मांडोळे, विवेक चौधरी, अनिल नागरे, वीज वितरण कंपनीचे अभियंता जि टी महाजन, एच ए जगताप, ए बी गढरी, व्ही व्ही बाविस्कर, जि एस जनोकर, जे बी सूर्यवंशी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रमेश सोनवणे यांनी केले.यावेळी पुढे बोलतांना आमदार चव्हाण यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणावर बोट ठेवले. ते म्हणाले, ज्यांच्या कडे वीज आहे त्यांना रात्रीची वीज मिळत असल्याने शेतक?्यांचे अतोनात हाल होत आहेत. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे जर सर्वसामान्यांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागणार आहेत सरकारने शेतक?्यांना वीज कनेक्शन उपलब्ध न केल्यास थेट मंत्रालयासमोरच एल्गार करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

मेळाव्याचे उद्घाटन झाल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी कार्यकारी अभियंता यांच्यासोबत बसून ग्राहकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या सोडविण्याच्या योग्य सुचना देखील अधिका-यांना केल्या. यामुळे मेळाव्याला जनता दरबाराचे स्वरुप आल्याचे पहावयास मिळाले.ग्राहकांची समस्या सोडविणे सोयीचे व्हावे म्हणून शहर व तालुक्यातील वीज कंपनीच्या १६ उपविभाग प्रमाणे अधिका?्यांचे टेबल लावण्यात आले होते. त्यात कोणत्या उपविभागात कोणती गावे समाविष्ट आहेत. याचे फ्लेक्स लावले होते. त्यामुळे विशेषत: ग्रामीण भागातील ग्राहकांची मोठी सोय होत होती. तसेच ग्राहकांसाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्यामार्फत चहा व नाश्त्याची सोय करण्यात आली होती. ६६ तक्रारी, १० तक्रारींचा जागेवरच निपटारामेळाव्यात ६६ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील १० तक्रारी तत्काळ सोडविण्यात आल्यात तर १७ तक्रारी या येत्या ३ दिवसात सोडविण्यात येतील. १३ तक्रारी येत्या ७ दिवसात सोडविल्या जाणार आहेत. उर्वरित १७ तक्रारी या शासकीय धोरणाशी सबंधित असअसल्याची माहिती कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांनी दिली. सूत्रसंचालन धनंजय मांडोळे यांनी केले.