शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

सुरेशदादा जैन यांच्या विक्रमाविषयी उत्सुकता

By admin | Updated: October 7, 2014 15:09 IST

आमदार सुरेशदादा जैन हे सलग १0 वी विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी आखाड्यात उतरले असून विजयी होऊन ते विक्रम प्रस्थापित करतात का? याकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

विकास पाटील■ जळगाव

आमदार सुरेशदादा जैन हे सलग १0 वी विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी आखाड्यात उतरले असून विजयी होऊन ते विक्रम प्रस्थापित करतात का? याकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. 
२0१४ ची विधानसभेची निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण आहे. या वेळी जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात एकूण १७ उमेदवार रिंगणात असून पहिल्यांदाच पंचरंगी लढत होत आहे. युतीचा घटस्फोट आणि आघाडीची बिघाडी झाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेनेचे उमदेवार स्वतंत्रपणे निवडणूक लढत आहेत. 
पंचरंगी लढत 
शिवसेनेतर्फे आमदार सुरेशदादा जैन, भाजपातर्फे सुरेश भोळे, काँग्रेसतर्फे डॉ.राधेश्याम चौधरी, राष्ट्रवादीतर्फे मनोज चौधरी आणि मनसेतर्फे ललित कोल्हे निवडणूक लढवित आहेत. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी बंडखोरी केली असून ते समाजवादी पक्षातर्फे लढत आहेत. अशा प्रकारे शहरात पंचरंगी लढत आहे. 
तीन लेवा पाटील उमेदवार
या पाच उमेदवारांमध्ये लेवा पाटील समाजाचे सुरेश भोळे, मनोज चौधरी आणि ललित कोल्हे हे तीन उमेदवार आहेत. पहिल्यांदाच लेवा पाटील समाजाचे तीन उमेदवार रिंगणात असल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. 
१९९९ मध्ये स्वतंत्र लढले
यापूर्वी १९९९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढली होती. त्या वेळी सेनेकडून सुरेशदादा जैन हे विजयी झाले होते. तेव्हा सुरेशदादा यांना ६३ हजार ९६४, तर काँग्रेसचे उमेदवार डॉ.अर्जुन भंगाळे यांना ४१ हजार २८0 आणि राष्ट्रवादीचे उमेदवार प्राचार्य काशिनाथ राघो सोनवणे यांना ६ हजार ३२७ मते मिळाली होती. 
महापालिकेत खाविआच
या वेळी काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यासह भाजपा व सेनाही स्वतंत्र लढत आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत खान्देश विकास आघाडीच्या विरुद्ध भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे लढली. मात्र जनतेने खाविआलाच कौल दिला. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत जळगावकरांनी युतीच्या उमेदवाराला मताधिक्य दिले. आता भाजपा, सेनेचे स्वतंत्र उमेदवार आहेत. त्यामुळे मताधिक्य कुणाला मिळते याकडे लक्ष लागून आहे. 
---------
सुरेशदादांची विक्रमाकडे वाटचाल
१९८0 पासून आमदार सुरेशदादा जैन हे मोठय़ा मताधिक्याने निवडून येत आहेत. २0१४ ची निवडणूक ही त्यांची १0 वी विधानसभेची निवडणूक आहे. घरकूलप्रकरणी ते कारागृहात असून तेथून ते निवडणूक लढत असून त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे पुत्र राजेश जैन आणि त्यांचे बंधू रमेशदादा जैन सांभाळत आहेत. कुणावरही आरोप प्रत्यारोप न करता संयमाने प्रचार सुरू आहे.
आमदार सुरेशदादा यांनी या वेळीही बाजी मारल्यास विक्रम प्रस्थापित होणार आहे. पंचरंगी लढत असली तरी त्यांच्याविरुद्ध तगडा उमेदवार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज चौधरी यांनी गतवेळी सुरेशदादा यांच्याविरुद्ध अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. मात्र त्यांना अपयश आले होते. आता ते पुन्हा एकदा नशीब अजमावत आहेत.
 ----------
प्रचार जोरात
सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून जोमाने प्रचार सुरू झाला आहे. कॉर्नर मीटिंग, प्रचारफेरी, जाहीर सभांचा धडाका सुरू झाला आहे. भाजपातर्फे आतापर्यंत खासदार नंदकुमार चौहान आणि स्मृती इराणी यांची जाहीर सभा घेण्यात आली असून येत्या काही दिवसात उद्धव व आदित्य ठाकरे यांची शहरात सभा होणार आहे.