शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जामनेरला लोकनियुक्त नगराध्यक्षाबाबत उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 17:02 IST

आगामी नगरपालिका निवडणुकीत ओबीसी संवर्गात उमेदवारीसाठी स्पर्धा

ठळक मुद्देलोकनियुक्त नगराध्यक्षांची चौथी सार्वत्रिक निवडणूकअडीच वर्षानंतर आघाडीच्या नगरसेवकांनी दिली जलसंपदा मंत्र्यांना साथजामनेरकरांनी दिला होता आघाडीला कौल

लोकमत न्यूज नेटवर्कजामनेर, दि.१७ : आगामी काळात होणाºया जामनेर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने त्याविषयी जनमानसात उत्सुकता आहे. ओबीसी संवर्गातील राजकीय कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून कुटूंबातील महिलेला उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.नगर पालिकेच्या पहिल्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणुन राजु बोहरा विजयी झाले होते. भाजपचे (स्व.) ईश्वर वाघ यांनी त्यावेळी कडवी झुंज दिली होती. दुसºया निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्याने नगराध्यक्षपद साधना महाजन यांना दिले गेले. तिसºया निवडणुकीत काँग्रेस आघाडीने मुसंडी घेतल्याने पारस ललवाणी नगराध्यक्ष झाले. त्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपताच आघाडीत बिघाडी होवुन सत्तेची सुत्रे भाजपकडे येऊन पुन्हा साधना महाजन याचेकडे नगराध्यक्षपद आले होेते.चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडला जाणारा लोकनियुक्त नगराध्यक्ष ओबीसी महिला आरक्षित आहे. अडीच वर्षापूर्वीच ललवाणी यांच्या नंतर नगराध्यक्ष पदासाठी तत्कालीन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.शरद पाटील यांच्या पत्नी सविता पाटील यांची दावेदारी मानली जात होती. त्यांना तसा शब्दही दिल्याचे ते सांगत, मात्र राजकारणात केव्हाही काहीही होवु शकते या उक्तीनुसार आघाडीच्याच नगरसेवकांनी ललवाणी यांची साथ सोडून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे बोट धरुन सत्तेत भागीदारी स्विकारली.यंदा ओबीसीतील मराठा, माळी, मुस्लीम या बहुमतात असलेल्या समाज घटकातील कार्यकर्त्यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळावी यासाठी आपापल्या नेत्यांकडे मागणी सुरु केली आहे. पालिका स्थापनेनंतर वीस वर्षात एकदाही या समाज घटकाला नगराध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळेच शहराचा दुसरा लोकनियुक्त नगराध्यक्ष कोण असेल याची नागरीकांमध्ये उत्सुकता लागुन आहे.विरोधकांच्या एकीची साशंकतातदरम्यान, या निवडणुकीत भाजप विरोधात सक्षमपणे लढण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र येतील काय? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. भाजपशी हातमिळवणी करणाºया नगरसेवकांबाबत मतदारांमध्ये निश्चीतच चांगली भावना नाही. भाजपने कोणत्याही प्रकारे सत्ता मिळविली असली तरी त्यामाध्यमातून त्यांनी केलेली विकासाची कामे ही त्यांची जमेची बाजू ठरत आहे.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षJamnerजामनेरPoliticsराजकारण