शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
2
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
3
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
4
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 
5
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
6
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
7
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
8
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
9
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
10
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
11
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
12
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
13
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
14
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
15
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
16
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
17
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
18
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
19
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
20
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली

खामखेडे येथे जि.प.च्या ११ शाळांचा सांस्कृतिक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 14:48 IST

खामखेडे येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत उचंदा केंद्रातील ११ शाळांचा सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडला.

ठळक मुद्देउचंदा केंद्रातील ११ शाळांचा सांस्कृतिक महोत्सवयाआधी पार पडला बालआनंद मेळावाविद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केले विविध कला गुणदर्शन

मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील खामखेडे येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत उचंदा केंद्रातील ११ शाळांचा सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडला.याआधी बालआनंद मेळावा घेण्यात आला. त्याचा आनंद विद्यार्थी शिक्षक व पालकांनी घेतला. त्यानंतर ११ शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत विविध कला गुणदर्शन सादर केले. पालकांनी त्यांचे कौतुक केले . याप्रसंगी विनोद सोनवणे यांनी कार्यक्रमाला भेट दिली. त्यानी प्रत्येक शाळेला ट्रॉफी, पदक व प्रमाणपत्र यासाठी योगदान दिले.या कार्यक्रमात जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त सुरेश रुपचंद सोनवणे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच जगताप यांच्या मुलीने पदक मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके व उचंदा केंद्राचे केंद्रप्रमुख ठोसर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खामखेडे येथील सरपंच वत्सला सोनवणे होत्या.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश गवते, जि.प.सदस्या वैशाली तायडे, पंचायत समिती सदस्य शुभांगी भोलाणे अतिथी होते.सूत्रसंचालन जयवंत बोदडे, पल्लवी कळमकर, साहित्यिक अ. फ. भालेराव व सुरेश बोरसे यांनी केले. आभार ज्ञानेश्वर पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी केंद्रातील शिक्षक सदार, मोरे, ई.ओ.पाटील, खैरनार, बोरकर, जगताप, पवार, वारके, अडकमोल, परखड, संगीता पाटील यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :SchoolशाळाMuktainagarमुक्ताईनगर