शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहीद स्मारकामध्ये पिंपळाच्या रोपांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 12:15 IST

जळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी उद्यानातील शहीद स्मारकामध्ये राष्ट्रीय हरीत सेना, सामाजिक वनीकरण, ...

जळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी उद्यानातील शहीद स्मारकामध्ये राष्ट्रीय हरीत सेना, सामाजिक वनीकरण, जळगाव वनविभाग तसेच मातृभूमी सर्वांगीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळाच्या रोपांची लागवड मान्यवरांच्याहस्ते करण्यात आली.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शहीद स्मारकाजवळ बुधवारी चार पिंपळाची झाडे लावण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महात्मा गांधी यांनी १९३६ साली वर्धा येथील पवनार आश्रमात पिंपळाचे झाड लावले होते. या झाडाच्या बियांपासून तयार केलेली पिंपळाची रोपे यासाठी येथे आणण्यात आली आहेत. यावेळी १९५५च्या गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक शांताराम वाणी, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याहस्ते या चार वृक्षांची लागवड करण्यात आली.याप्रसंगी जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार, विभागीय वन अधिकारी एस. आय. शेख, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, तहसीलदार वैशाली हिंगे, वन परिक्षेत्र अधिकारी एन. जी. पाटील, भास्कर भोळे, नरेंद्र जावळे, बी. बी. जोमीवाले, पी. टी. वराडे, गोपीचंद सपकाळे यांच्यासह जिजामाता विद्यालयाचे हरीत सेनेचे विद्यार्थी, मातृभूमी सर्वांगीण विकास संस्थेचे पदाधिकारी, सामाजिक वनीकरण, महापालिका व वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.याचबरोबर जिल्ह्यातील शहीद स्मारक, आडगाव, ता. एरंडोल, शहीद स्मारक, पाचोरा, शहर वाहतूक शाखा, शहीद राकेश शिंदे स्मारक, जामनेर रोड, भुसावळ, शहीद नरेंद्र महाजन स्मारक, जुना सातारा चौफुली, भुसावळ, शहीद स्मारक नागलवाडी, ता. चोपडा येथेही पिंपळाचे वृक्ष लावण्यात आल्याची माहिती विभागीय वन अधिकारी शेख यांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव