शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

चाळीसगावच्या शिरपेचात 'सुपर राईंडर'चा तुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 23:16 IST

टोनी पंजाबी व अरुण महाजन या दोन चाळीसगावकर सायकलवीरांनी ३८ तासात ६०० किमी बीआरएम स्पर्धेचे अंतर पार केले.

ठळक मुद्देव्हॅलेंटाईनची अनोखी भेटः दोघा सायकलवीरांनी ३८ तासात ६०० किमीचे गाठले लक्ष्य

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : टोनी पंजाबी व अरुण महाजन या दोन चाळीसगावकर सायकलवीरांनी ३८ तासात ६०० किमी बीआरएम स्पर्धेचे अंतर पार करुन पहिल्यांदाच मानाच्या सायकल स्पर्धेत चाळीसगावचे नाव कोरले आहे. त्यांना 'सुपर राईंडरचा' किताब मिळाला आहे. ही स्पर्धा शनिवारी धुळे येथून पहाटे सुरु झाली होती. सांगता रविवारी सायंकाळी झाली.  

एडॉक्स गृपतर्फे आयोजित ६०० किमी बीआरएम सायकल स्पर्धेचे धुळे येथे आयोजन केले होते. शनिवारी धुळे येथील देवपूर बसस्थानक परिसरातून स्पर्धेच्या शुभारंभाचा सायरन वाजला. यात चाळीसगावच्या टोनी पंजाबी, अरुण महाजन व रवींद्र पाटील यांच्या सायकलींची चाके धावली. तथापि रवींद्र पाटील यांची सायकल दिडशे किमीचे अंतर पार केल्यानंतर नादूरुस्त झाल्याने त्यांना स्पर्धेतून बाहेर बडावे लागले. टोनी पंजाबी व अरुण महाजन यांनी मात्र मोठ्या जिद्दीने आपले लक्ष्य सर केले. 

टार्गेट ३८ तासातच पूर्ण 

धुळे ते मध्यप्रदेशातील टिकरी. तेथून परत धुळे आणि तेथून नाशिक ते पुन्हा धुळे. असा यास्पर्धेचा ६०० किमीचा मार्ग होता. यासाठी सायकलवीरांना ४० तास देण्यात आले होते. टोनी पंजाबी व अरुण महाजन यांनी ३८ तासात टार्गेट पार करुन जल्लोष केला. त्यांना 'सुपर राईंडर' हा सायकलवीरांसाठी देण्यात येणारा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या दोघा सायकलवीरांच्या रुपाने चाळीसगावला प्रथमच  सायकलिस्ट एसआर मिळाले आहे. या त्यांच्या कर्तृत्वाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

व्हॅलेंटाईनच्या प्रेममय पर्वणीवर आम्ही हे लक्ष्य गाठले. याचा विशेष अभिमान वाटतो. चाळीसगाव सर्वच क्षेत्रात पुढे आहे. सायकल स्पर्धेतही आपल्या गावाची मुद्रा उमटली पाहिजे. याचसाठी आम्ही सायकलला जिद्दीने पायडल मारले. चाळीसगावकरांनी २००, ३०० व ४०० किमीच्या स्पर्धेत यश मिळविल्यानंतर खूप प्रोत्साहन दिले. -टोनी पंजाबी, अरुण महाजन, एसआर सायकलिस्ट, चाळीसगाव.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावCyclingसायकलिंग