शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर कार्यासाठी तापी-पूर्णा संगमावर होणारी गर्दी कोरोनामुळे निर्मनुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 16:22 IST

यंदा कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून पौराहित्य व्यवसाय ठप्प असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपौराहित्यही ठप्पगेल्या चार महिन्यांपासून किनारा सुना-सुना

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : अंत्यसंस्कार, दशक्रिया विधीत पौराहित्याला मोठे महत्व आहे. पाठोपाठ व्रत वैकल्य आणि धार्मिक विधी पुण्यकार्यासाठी श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशात विविध धार्मिक कार्यासाठी पुरोहितांची पौरोहित्य करण्यामोठी मागणी असते. परंतु यंदा कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून पौराहित्य व्यवसाय ठप्प असल्याचे चित्र आहे.कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या पार्श्वभूमीवर विविध विधी करण्यास लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग यामुळे पौराहित्य यावर बंधने आली असल्याने पौराहित्य करून घेण्याची इच्छा असली तरी ते करता येत नाही अशी स्थिती आहे.पवित्र नद्या व संगमावर अस्थी विसर्जनास मोठे धार्मिक महत्व आहे. मृतात्म्यास शांती लाभण्यास त्यांच्या अस्थीचे विसर्जन पवित्र नद्या व संगमावर अस्थी विसर्जनास मोठे धार्मिक महत्व आहे. या अनुषंगाने तालुक्यातील चांगदेव येथे पवित्र तापी पूर्णा नदी संगमावर अस्थी विसर्जन आणि उत्तरकार्य विधीसाठी जिल्हा व जिल्हाबाहेरील नागरिक येतात. मृत्यू पावलेल्या अनेक राष्ट्रीय व प्रादेशिक नेत्यांचे अस्थी विसर्जन येथे होत असतात. परंतु कोरोना काळात संगमावर अस्थी विसर्जनासाठी नागरिक येतच नसल्याचे संगमावर शुकशुकाट आहे. त्यामुळे येथील पौरोहित्य बंद आहे. कोरोनाने धार्मिक विधी विधान पूर्ण करण्यावरही संकट आणले आहे.कोरोना संकटात लॉकडाउनमुळे वाहन व्यवस्था आणि पासेसची सक्ती यामुळे बाहेरील यजमान वेगवेगळ्या विधी करण्यास पवित्र तापी पूर्णा संगमावर येण्यास मोठी अडचण आहे. सध्या लोक घराबाहेरही पडत नाही. सुरक्षा म्हणून सोशल डिस्टन्सिंग पाळण्यास घरीही धार्मिक विधी टाळत आहे. यामुळे पौराहित्य कार्य अत्यल्प प्रमाणात केले जात आहे.-अनिल कुलकर्णी, पुरोहित, चांगदेव, ता.मुक्ताईनगर 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर