जळगाव : यावल तालुक्यात ३ ते ४ ऑक्टोबर या कालावधित झालेल्या अवकाळी पाऊस व वादळाने ६८.७१ हेक्टरवरील केळी, मका, कापूस, ज्वारी पिकाचे ६४.४८ लाख रुपयांचे नुकसान झाले असून नऊ गावातील २१0 शेतकरी बाधित झाले आहेत. ३ ते ४ ऑक्टोबर दरम्यान यावल तालुक्यात वादळी वार्यासह अवकाळी पाऊस झाला होता. त्यात केळी, ज्वारी, मका, मूग या पिकांचे नुकसान झाले होते. या शेतीपिकांच्या नुकसानीचा अंतिम संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. तालुक्यात सर्वाधिक ४३.४७ हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले आहे. कापूस-१७.४४ हेक्टर, ज्वारी-६.५0 हेक्टर, मका-९0 एकर, मूग-४0 एकरवरील नुकसान झाले आहे. आता शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. तातडीने मदत मिळावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. |
पिकांचे ६४ लाखांचे नुकसान
By admin | Updated: November 6, 2014 15:24 IST