शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेत नुकसानच जास्त

By admin | Updated: May 20, 2014 01:12 IST

दिनकर मोरे ल्ल धुळे महसूल व कृषी विभागाच्या चुकीमुळे राष्ट्रीय पीक विमा योजनेत धुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे फायद्याऐवजी नुकसानच जास्त झाले आहे.

दिनकर मोरे ल्ल धुळे महसूल व कृषी विभागाच्या चुकीमुळे राष्ट्रीय पीक विमा योजनेत धुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे फायद्याऐवजी नुकसानच जास्त झाले आहे. २००१ पासून विचार करता आतापर्यंत केवळ दोनच हंगामात नुकसान भरपाई मिळाली आहे. त्यामुळे या योजनेकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरविली आहे. केंद्र व राज्य शासनाने १९८२ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर राष्ट्रीय पीक विमा योजना सुरू केली. त्याचे परिणाम चांगले दिसू लागल्याने १९८५ मध्ये त्याची व्याप्ती पूर्ण देशात वाढविण्यात आली. या योजनेसाठी नुकसान ठरविण्याकरिता तालुका घटक गृहीत धरण्यात आला. परंतु त्यातही काहींचे नुकसान होऊ लागल्याने शेतकर्‍यांच्या तक्रारी वाढल्या. म्हणून त्यात बदल करून तालुका पातळीवरून सर्कल (मंडळनिहाय) नुकसानीसाठी गृहीत धरण्यात आले. त्यामुळे या योजनेचा शेतकर्‍यांना चांगला फायदा होऊ लागला. म्हणून पीक कर्जदार शेतकर्‍यांना १९९९ पासून पीक विमा घेणे बंधनकारक केले. त्यातही महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना फायदे तर काही जिल्ह्यांना नुकसान होऊ लागले. त्यामुळे पुन्हा शेतकर्‍यांच्या तक्रारी वाढल्याने २००६ मध्ये ही योजना ऐच्छिक करण्यात आली. राज्याला फायदा ंराज्याचा विचार केल्यास ही योजना फायदेशीर आहे. १९९९-२००० ते २०१२-१३च्या हंगामापर्यंत राज्यातील शेतकर्‍यांनी पीक विमा हप्त्यापोटी ७९३ कोटी १६ लाख रुपये विमा कंपनीकडे भरले होते. त्याची नुकसान भरपाई २८०२ कोटी २८ लाख रुपये आतापर्यंत शेतकर्‍यांना देण्यात आली आहे. ही आकडेवारी पाहता पीक विमा योजना ही राज्यासाठी फायद्याची वाटते. धुळे जिल्ह्याला फटका धुळे जिल्ह्याचा विचार करता २००१ ते २०१३ या वर्षात खरीप व रब्बी असे २६ हंगामातील १७ हंगामांमध्ये शेतकर्‍यांनी फक्त पीक विम्याचे हप्ते भरले. परंतु नुकसान भरपाई एक रुपयाही मिळाली नाही. ८ हंगामात नुकसान भरपाई मिळाली. परंतु त्यात भरलेल्या हप्त्यापोटीची रक्कमही पुरेशी मिळाली नाही. फक्त दोन हंगामात म्हणजे रब्बी २००१-२००२ मध्ये व खरीप २००८ मध्ये भरलेल्या हप्त्याच्या रकमेपेक्षा जास्त नुकसान भरपाई मिळाली. याचाच अर्थ २६ हंगामात जिल्ह्यातील शेतकरी नुकसानीत आहे. विशेष म्हणजे २०१२ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ होता. त्यामुळे त्यावर्षी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना २०१ कोटी ४३ लाख रुपये विम्याची नुकसान भरपाई म्हणून मिळाली. दुष्काळ धुळे जिल्ह्यातही होता, तरीही जिल्ह्यातील शेतकर्‍यांना फक्त ५ लाख ६४ हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली. मात्र प्रत्यक्षात शेतकर्‍यांनी ८ लाख १० हजार रुपयांचा हप्ता (एकत्रित) भरलेला होता. म्हणजे दुष्काळ असतानाही ३ लाखांचा फटका बसला होता. या योजनेत १८०६ शेतकर्‍यांनी सहभाग घेतला होता. तर ३१२ शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली. या शेतकर्‍यांना मिळालेल्या नुकसान भरपाईची सरासरी काढली असता एका शेतकर्‍याला फक्त १८२० रुपये मिळाले होते. त्यामुळे ही शेतकर्‍यांची थट्टाच म्हणावी लागले. दुसरीकडे इतर जिल्ह्यांचा विचार करता नगर जिल्ह्याला खरीप व रब्बी २०१२ व खरीप २०१३ मध्ये मागील तीन हंगामात राज्याला मिळालेल्या ८९९ कोटींपैकी ३२४ कोटी रुपये फक्त नगर जिल्ह्याला मिळाले आहे. शेतकर्‍यांनी फिरवली पाठ या योजनेचा फायदा होईल म्हणून शेतकरी सुरुवातीला सहभागी होऊ लागले. परंतु फायदा होत नसल्याने त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. खरीप २००५ मध्ये जिल्ह्यातील ७० हजार शेतकरी सहभागी झाले होते. तर २००६ मध्ये ही संख्या १७ हजारांवर आली. २००७ मध्ये तर एकही शेतकरी सहभागी झाला नाही. त्यामुळे प्रशाकीय स्तरावरून शेतकर्‍यांचा सहभाग वाढविण्यासाठी दबाव आल्याने खरीप २०११ मध्ये ६ हजार शेतकरी सहभागी झाले होते, तर खरीप २०१२ मध्ये केवळ २ हजारच शेतकरी सहभागी झाले आहे. एकंदरीतच या योजनेच्या तोट्यामुळे शेतकर्‍यांनी पाठ फिरविली आहे.