शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
3
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
4
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
5
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
6
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
7
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
8
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
9
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
10
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
12
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
13
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
14
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
15
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
16
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
17
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
18
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
19
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
20
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट

परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 23:38 IST

एरंडोल तालुक्यात अतिवृष्टी : चाळीसगावात गाय मृत्यूमुखी, गिरणा नदीला प्रथमच पूर, एरंडोल तालुक्यात बैल, वासराचा मृत्यू

ठळक मुद्देकाही गावांचा संपर्क तुटलाअग्नावती, भोकरबारी, बोरी, मन्याड या प्रकल्पांमध्ये शून्य साठाअधून-मधून पडतोय पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : जिल्ह्यात गेल्या २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी संध्याकाळपासून ते गुरुवारी सकाळपर्यंत जोरदार हजेरी लावल्याने केळी व कपाशीचे नुकसान झाले असून महसूल विभागाकडून पंचनामे सुरू करण्यात आले आहे. गेल्या २४ तासात विक्रमी ४४१.४ मि.मी.इतका एकूण पाऊस जिल्ह्यात झाला. एरंडोल तालुक्यात सर्वाधिक ७८ मि.मी. पाऊस झाला.चाळीसगाव तालुक्यात गाय तर एरंडोल तालुक्यात बैल व वासराचा या परतीच्या पावसामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दमदार पावसामुळे यंदाच्या मोसमात प्रथमच गिरणा नदीला पूर आला असून दापोरा तसेच कांताई बंधारा ओसंडून वाहत आहे.एरंडोल तालुक्यात अतिवृष्टी झाली असून या तालुक्याची सरासरी शंभरीपर्यंत पोहचण्यास केवळ २.१ टक्के पावसाची गरज असल्याचेही चित्र आहे. तर धरणसाठ्यातही वाढ झाली आहे.बुधवार, २० सप्टेंबर संध्याकाळपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली व तो अधून-मधून सकाळपर्यंत सुरूच होता. यंदाच्या मोसमात गिरणा नदीला पहिल्यांदा पूर आल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे.पिकांचे नुकसानजिल्ह्यात या परतीच्या पावसाने केळी, कपाशी पिकाचे नुकसान केले असून त्याचे महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात येत आहे. हे पंचनामे पूर्ण झालेले नसल्याने नुकसानीचा आकडा समजू शकला नाही. एरंडोल तालुक्यात सर्वाधिक ७८ मि.मी. पाऊस झाला तर सर्वात कमी ९.२ मि.मी. पाऊस पारोळा तालुक्यात झाला.चार प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठाजिल्ह्यातील मोठ्या जलसाठ्यांमध्ये वाढ झाली असली तरी चार प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. हतनूर धरणात ८१.१८, गिरणा धरणात ६४.३३ तर वाघूर धरणात ६९.३१ टक्के जलसाठा आहे. अग्नावती, भोकरबारी, बोरी, मन्याड या प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. गेल्या आठवड्यात शून्य टक्के असलेल्या हिवरा, बहुळा प्रकल्पामध्ये अनुक्रमे १६.३१ व ३.७९ टक्के जलसाठा झाला आहे. अंजनी प्रकल्पातील साठा केवळ ४.२८ टक्केच आहे.धुळ्यात अर्ज भरणाºयांवर पाऊसशिरपूर तालुक्यात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला. एकाच दिवसात ६६ मि.मी. पावसाची नोंद झाली. शिरपुरात रात्री साडेआठ वाजेपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले होते़ तहसील कार्यालयासमोरही पाणी साचले़ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरणाºयांनी तोबा गर्दी केली होती़ पाणी साचल्यामुळे इच्छुक उमेदवारांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागला़नंदुरबार चारशे हेक्टरचे नुकसानजिल्ह्यात तळोदा, शहादा आणि नंदुरबार तालुक्यातील काही भागात ऊस व मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. साधारणत: साडेतीनशे ते चारशे हेक्टवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.धडगाव तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे तर नंदुरबार व तळोदा तालुकादेखील सरासरीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील चार मध्यम व ३७ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ७० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा झाला आहे.गावांचा संपर्क तुटलागिरणा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने दापोरी, रवंजा, खर्ची या परिसरातून जळगावला येण्यासाठी सोयीचा असलेला मार्ग बंद झाल्याने या गावांचा संपर्क तुटला.रावेर तालुक्यात संततधाररावेर शहरासह तालुक्यात बुधवारी रात्री पासून सुरू असलेल्या पावसाची संततधार गुरुवारी सुरू होती. दरम्यान ४४. ४२ मि.मी. पाऊस झाला. आता ८९.७८ टक्के पर्जन्यमान गाठले आहे. सुकी धरण ९६.६४ टक्के भरले आहे. ०.९४ मिटरचा अनुशेष बाकी आहे. आभोडा ८५.४२ टक्के भरले. ते ०.८० मीटरने खाली आहे. दोन्ही धरणे भरण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. गुरुवारी पहाटेपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने कमी अधिक जोराने हजेरी लावली आहे.यावलला ५० लाखांचे नुकसानतालुक्यात बुधवारी सांयकाळी झालेल्या एक तास वादळी पावसाने यावल शहरासह तालुक्यातील निमगाव येथील सुमारे १ हजार हेक्टर शेतीतील ज्वारी, कपाशी, मका, व केळी पिकाचे सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले आहे. नुकसान ग्रस्त भागात पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे. येथे एका तासात ४० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.टेंभी शिवारात असलेल्या राजकुमार पाटील व काशीनाथ पाटील यांच्या ६ हजार केळीच्या खोडांचे नुकसान झाले आहे. त्यांच्यासह इतरही १२ ते १५ शेतकºयांच्या कपाशीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील बळीराजाचा पुन्हा बळी गेला आहे. शेतकºयांकडून पंचनामे करण्याची मागणी होत आहे़पंचनाम्यासाठी तलाठी व कृषी सहायक जात आहेत़ शेतकºयांनी पीकविमा कंपनीकडे तक्रार नोंदवून पंचनामा करवून घ्यावा. आम्हीही प्रयत्न करितच आहोत.- कुंदन हिरे, तहसीलदार, यावल.हतनूरचे २० दरवाजे उघडलेभुसावळ : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने तापीनदीवरील हतनूर धरणाचे ४१ पैकी वीस दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे.