जुनच्या सुरुवातीला बरसलेल्या पावसावर अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केेल्या; दरम्यान पावसाने एकदा हजेरी लावली त्यानंतर मात्र पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने सुरुवातीला केलेला पेरणीचा सर्व खर्च वाया गेला आहे. महागडी बियाणे, रासायनिक खते, शेतमजुरी आदी सर्व पाण्याअभावी वाया गेल्याने कर्जाच्या बोजाखाली शेतकरी दाबला जात आहे. दिवसा कडकडीत ऊन व भयंकर उकाड्यामुळे पिके करपली आहेत. तर अनेक शेतातील बी पक्षी कोरून खात आहेत. ‘कोरोनाची आढी, पावसाची दडी व शेतकऱ्यांची विस्कटली आर्थिक घडी’ अशी स्थिती झाली आहे. त्यात भरमसाठ वाढलेल्या महागाईने जगाच्या पोशिंद्यावर संकटाचा मोठा भार वाढला आहे. शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नगरदेवळा परिसरात दुबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:11 IST