शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
3
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
4
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
5
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
6
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
7
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
8
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
10
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
11
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
12
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
13
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
15
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
16
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
17
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
18
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
19
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
20
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांचा जोर, पोलीस कमजोर

By admin | Updated: June 30, 2014 14:08 IST

काही वर्षांपूर्वी पोलीस दादाचा असणारा दरारा जळगावातील वाढत्या गुन्हेगारी उपद्रवामुळे कमी होत चालला आहे.

 

 
पोलिसांचा धाक संपला : अंतर्गत वादविवाद चव्हाट्यावर
जळगाव : काही वर्षांपूर्वी पोलीस दादाचा असणारा दरारा जळगावातील वाढत्या गुन्हेगारी उपद्रवामुळे कमी होत चालला आहे. प्रभारी अधिकार्‍यांची कचखाऊ भूमिका, अंतर्गत वादविवाद आणि एकमेकाशी असलेले आर्थिक हितसंबंध यामुळे गुन्हेगार शिरजोर आणि पोलीस कमजोर होत आहेत. 
जळगाव शहर हे जिल्हा पोलीस दलाचा चेहरा मानले जाते. मात्र हेच जळगाव काही महिन्यांपासून संवेदनशील होऊ पाहत आहे. त्यामुळे चोरी, दरोडे, हाणामारी, खून आणि अपहरण हे प्रकार नित्याचे झाले आहेत. संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तसेच कर्मचारी मात्र गुन्हेगारी घटनांबाबत सतर्क नाहीत. 
पोलिसांसमोर हाणामारी नित्याची
उपद्रवी नागरिकांवरील पोलिसांचा वचक संपल्याने चक्क पोलिसांसमोर हाणामारीच्या तीन चार घटना या दोन महिन्यात घडल्या आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला दक्षता समितीच्या कार्यालयात दोन महिलांनी एकमेकींना मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना होत नाही तोच शनिवारी जिल्हा रुग्णालयात एमपीडीएच्या कारवाईतील आरोपी भगवान हटकर आणि मनसेचे नगरसेवक संतोष पाटील यांच्या गटात जिल्हा रुग्णालयात वाद झाला. भगवान हटकर याने हुज्जत घालत व शिवीगाळ करीत चक्क पोलिसांना आव्हान दिले आहे.
पोलिसांची विश्‍वासार्हता धोक्यात
८ जून रोजी कांचननगर भागातील निकेश सोनवणे या तरुणाला वाळू व्यावसायिक आबा बाविस्कर व त्याच्या सहकार्‍यांनी बेदम मारहाण केली. उपचारादरम्यान निकेशचा मृत्यू झाला. मारेकर्‍यांच्या दहशतीपोटी घटना पाहणारे आजूबाजूचे नागरिकच काय तर त्याचे कुटुंबीयदेखील फिर्याद देण्यासाठी पुढे आले नाहीत. पोलिसांकडून आपल्याला न्याय मिळेलच याची शाश्‍वती आजही सर्वसामान्य नागरिकांना नाही. पोलिसांबद्दल कमी होत असलेली विश्‍वासार्हता ही चिंतन करायला लावणारी बाब आहे. 
अंतर्गत वादविवाद चव्हाट्यावर
पोलीसगिरीपेक्षा बहुतांश प्रभारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडून आर्थिक हितसंबंधांना प्राधान्य दिले जात आहे. औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनमध्ये तीन दिवसांपूर्वी सट्टा व जुगार अड्डय़ावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या साहाय्यक फौजदार आणि प्रभारी अधिकारी यांच्यात वादाची ठिणगी पडली. देवाणघेवाणीतून सुरू झालेला हा वाद उपअधीक्षकांच्या दालनापर्यंत पोहचला. मात्र पोलीस स्टेशनच्या काही अनुभवी कर्मचार्‍यांनी मध्यस्थी करीत वाद मिटविला. तशीच काहीशी अवस्था शहर पोलीस स्टेशनची आहे. रामानंदनगर पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकार्‍यांचा प्रभावच जाणवत नसल्याने कळत नकळत त्याचा भार दुय्यम अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर येत आहे.
 
अवैध धंद्यांवरील कारवाई दोन दिवसात थंडावली
पोलीस प्रशासनातर्फे मागच्या आठवड्यात अवैध धंद्याच्या विरोधात मोहीम राबविली. स्थानिक गुन्हा शाखेने कारवाईत उडी घेतल्यामुळे स्थानिक पोलीस स्टेशनचीदेखील पंचाईत झाली. दोन दिवसात पेढीमालक व चालक यांच्यावर सात ते आठ गुन्हे दाखल झाले. नंतर अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाईसाठी मैदानात उतरलेली स्थानिक गुन्हा शाखादेखील थंडावली. त्यामुळेच आंबेडकर मार्केट, रेल्वे स्टेशन परिसर, नेरी नाका स्मशानभूमी, नागसेननगर, कृषी उत्पन्न बाजार समिती या नेहमीच्या भागात सुरू असलेल्या सट्टा पेढीसोबतच शासकीय कार्यालयांमधील चालत्या बोलत्या सट्टा पेढीची भर पडली. ही बाब पोलीस प्रशासनाच्या नजरेत पडत नाही हे विशेष आहे. रावेर, फैजपूर, खानापूर यासारख्या सधन भागात सट्टा व जुगार अड्डे दिवसाढवळ्या सुरू असले तरी त्यावरील कारवाईचे धाडस केव्हा होणार हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे.