शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर, परिचारिका व सफाई कर्मचाऱ्यांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 11:42 IST

सदोष मनुष्यवध : वॉर्ड क्र.७ च्या स्टापवर ठपका, अहवाल रवाना

जळगाव : कोरोनाबाधित मालती चुडामण नेहते (८२) या वृध्देच्या मृत्यूप्रकरणी सामान्य रुग्णालय अर्थात कोविड रुग्णालयातील वॉर्ड क्र. ७ मधील डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी, वॉर्ड बॉय व इतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुध्द रात्री दहा वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा (कलम ३०४ अ) गुन्हा दाखल करण्यात आला.रुग्णालयाचे विशेष वैद्यकिय अधिकारी डॉ.स्वप्नील चंद्रकांत कळसकर (३७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मालती नेहते या १ जून रोजी ४.३० वाजता भुसावळ रेल्वे दवाखान्यातून जळगाव कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे नमुने घेतल्यानंतर त्याचा अहवाल ६ जून रोजी प्राप्त झाला व त्यात त्या कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. मात्र २ जून रोजी मालती नेहते या रुग्णालयातून निघून गेल्याची नोंद होती. त्याबाबत जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला कळविण्यात आले होते. बुधवार दि.१० रोजी वैद्यकिय अधिकारी म्हणून ड्युटीला असताना डॉ.किरण पाटील यांनी वॉर्ड क्र. ७ मध्ये बोलावले असता तेथील स्वच्छतागृहात एक महिला मृतावस्थेत आढळून आलेली होती. याबाबत पोलिसांना कळविले असता ही महिला मालती नेहते असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्या मृत्यूस रुग्णालयाच्या वॉर्ड क्र.७ मधील डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी व इतर संबंधित अधिकारी, कर्मचारी जबाबदार असून त्यांनी कामात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अकबर पटेल करीत आहेत.गुन्हा दाखल होईपर्यंत डॉ.रोहन पोलीस ठाण्यातजिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या बैठकीनंतर मालती नेहते यांच्या मृत्यूबाबत जबाबदारी निश्चित झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय झाला. वॉर्ड क्र.७ मधील संपूर्ण स्टाफविरुध्द ठपका ठेवण्यात आला. गुन्हा दाखल करण्यासाठी विशेष वैद्यकिय अधिकारी डॉ. सप्नील कळसकर यांना प्राधिकृत करण्यात आले. कळसकर यांच्यासह डॉ.किरण पाटील व डॉ.दत्तात्रय बिराजदार जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले. सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन हेदेखील तेथे पोहचले. गुन्हा दाखल झाल्यानंतरच डॉ.रोहन यांनी पोलीस ठाणे सोडले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव