शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी रॅली काढल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक काढण्यास बंदी घातल्यानंतरही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काव्यरत्नावली ते संत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक काढण्यास बंदी घातल्यानंतरही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काव्यरत्नावली ते संत गाडगेबाबा चौकापर्यंत दुचाकी रॅली काढणाऱ्या आठ तरुणांविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्‍यात जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. हा संसर्ग रोखण्‍यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काही निर्बंध घालून देण्‍यात आलेले आहे. मिरवणुका काढण्यास मनाई करण्‍यात आली आहे. बुधवारी शहरात अत्यंत साध्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. दुसरीकडे काही तरुणांनी काव्यरत्नावली चौक ते संत गाडगेबाबा चौकापर्यंत दुचाकी रॅली काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलिसांना कळताच, त्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली. नंतर त्यांच्याविरुद्ध जमावबंदीचे उल्लंघन केले व साथीच्या रोगाचा संसर्गाचा फैलाव करण्याचा धोका निर्माण केला म्हणून बुधवारी गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

यांचावर गुन्हा दाखल

शुभम मिलिंद पवार (२५,रा.केदारनगर, पिंप्राळा), स्वप्नील खंडारे, शुभम संजय शिरसाळे, विशाल भीमराव खैरनार (तिघे रा.पिंप्राळा हुडको), जितेंद्र शरद सोनवणे (२१, रा.आसोदा), अनुराज मांगो सोनवणे (१८,शिरसोली), अनिरुद्ध सुनील गाढे (१८,रा.समतानगर), विक्की चावदस सोनवणे (१८,रा.शिरसोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.