शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना न झालेल्यांना कोरोना अशी कोवीड केअरची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:47 IST

जळगाव : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मनपा प्रशासनाने तीन ठिकाणी कोवीड केअरसेंटरची व्यवस्था केली आहे. मात्र, याठिकाणी सुविधांच्या ...

जळगाव : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मनपा प्रशासनाने तीन ठिकाणी कोवीड केअरसेंटरची व्यवस्था केली आहे. मात्र, याठिकाणी सुविधांच्या अभावामुळे ज्या व्यक्तींना कोरोना नाही अशा व्यक्तींनाही या ठिकाणी कोरोना होईल अशी स्थिती या कोवीड केअर सेंटरमध्ये दिसून येत आहे. एका खोलीत दोन व्यक्तींची व्यवस्था करण्यात आली असून, चार व्यक्ती एकच शौचालय वापरत असल्याचे चित्र अभियांत्रिकी महाविद्यालयातील केअर सेंटरमध्ये दिसून आले.शहरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वसतीगृह, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, मनपाचे छत्रपती शाहू महाराज रुग्णालय व इकरा महाविद्यालय या ठिकाणी कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. एकूण ६५० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्यस्थितीत अभियांत्रिकी महाविद्यालयात २९ व्यक्ती क्वारंटाईन म्हणून ठेवण्यात आले आहेत. मात्र, त्यांना कुठल्याही सुविधा दिल्या जात नसल्याची तक्रार मनपा स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांनी केली आहे. अ‍ॅड.हाडा यांनी दोन दिवसांपूर्वी अभियांत्रिकी महाविद्यालयातील केअर सेंटरची पाहणी केली असता, त्यांना या ठिकाणी समस्या आढळून आल्या. याबाबती त्यांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांना पत्र पाठविले आहे.लक्षणे नसल्यास कुठलेही उपचार नाहीतअ‍ॅड. हाडा यांनी केलेल्या तक्रारीच्या पत्रात म्हटले आहे की, केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींना जर लक्षणे असतील तर च त्यांच्यावर उपचार केले जात आहे. तर ज्या व्यक्तींना लक्षणे नाहीत अशा व्यक्तींना कोणतीही औषधी दिली जात नाही. अशा व्यक्तींचा अहवाल निगेटीव्ह आला तर त्यांना घरी सोडण्यात येते. ज्यांना लक्षणे नसतील तर अशा व्यक्तींना केअर सेंटरमध्ये न ठेवता घरीच क्वारंटाईन करण्यात यावे असा सल्ला अ‍ॅड.हाडा यांनी दिला आहे. तसेच केअर सेंटरमध्ये क्व ारंटाईन केलेल्या व्यक्तींना सायंकाळ वसकाळचे जेवणासाठी एकत्र यावे लागत आहे. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याचीही शक्यता अधिक असते असेही सभापतींनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव