शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

कासोद्यात धाडशी घरफोडी फसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 21:02 IST

बुधवारी पहाटे चारला एका सराफी दुकानात चोरट्यांनी धाडशी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्रभर जागणाऱ्या होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने हा प्रयत्न फसला आहे.

ठळक मुद्देदरोडा टाकण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांच्या सहलीमुळे फसला होमगार्डची सतर्कता कामी आली

कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथे बुधवारी पहाटे चारला एका सराफी दुकानात चोरट्यांनी धाडशी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्रभर जागणाऱ्या होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने हा प्रयत्न फसला आहे. सराफाचे होऊ घातलेले मोठे नुकसान टळले आहे.येथे रविराज फोटो स्टुडिओच्या शेजारी केशव सोनार यांचे सराफा दुकान आहे. दि.७ रोजी कासोदा बाजार होता. दिवसभराचे कामकाज आटोपून सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वासुदेव सोनार यांनी दुकान बंद केले व घरी गेले. या दुकानाशेजारी वास्तव्य कमी व दुकाने जास्त असल्याने रात्री हा परिसर सामसूम असतो. शेजारी जिल्हा बँकेची शाखादेखील आहे. पण कर्मचारी कामकाज आटोपून घरी निघून जातात. या परिसराची आधी रेकी करण्यात आली असावी व नेमका हा चौक चोरट्यांनी निवडला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.दि.७ च्या रात्री आठ होमगार्ड गावात बंदोबस्ताला होते. दोन पोलीस गाडीसोबत असे १० होमगार्ड कर्तव्य बजावत होते. पहाटे चारला कर्तव्यावर असलेले सर्व होमगार्ड बिर्ला चौकात एकत्र आले. दररोजसारखा एकत्रित फोटो काढून खात्याच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केला. पहाटे साडेचार-पाचला लोक जागे झाल्यावर घरी जाण्याच्या तयारीत असताना शाळेच्या सहलीची बस गावात आली. त्या दरम्यान भडगावकडून एक चारचाकी गाडी गावात येताना होमगार्डस्ना दिसली. पण ती चारचाकी गाडी विद्यार्थ्यांची गर्दी पाहून थबकली व परत जाताना दिसली. ही गाडी परत का गेली या शंकेमुळे गावात कर्तव्यावर असलेले सर्व होमगार्ड गावातील प्रमुख रस्त्यावर धावले. ही गाडी केशव सोनार या सराफाच्या दुकानाजवळ थांबली. तिच्यातून दोन दरोडेखोर उतरले. त्यांच्या जवळच्या मोठ्या कटरने एका शटरची लॉकपट्टी (कान) कापले. दुसºया बाजूची लॉकपट्टी कापत असताना बाळू जाधव हा एकटा होमगार्ड या रस्त्याने धावला. मोटारसायकलचा लाईट चमकताना दिसताच हे दरोडेखोर पटापट गाडीत बसले. गाडी सुरुच होती. ती सुसाट वेगाने जगदंबा माता मंदिराच्या दिशेने पळाली. हा होमगार्ड मोटारसायकलवरच या कारच्या दिशेने जोरजोरात चोर-चोर आरोळ्या मारत धावला. पुढे मन्यार मशीद चौकात आनंद विसपुते व इस्त्याक अली यांनी ही गाडी अडवायचा प्रयत्न केला. मात्र हे दरोडेखोर भडगावच्या दिशेने पसार होण्यात यशस्वी झाले आहेत.पोलिसांनी घेतली बैठकदरम्यान, पोलिसांनी बुधवारी सायंकाळी गावातील व्यापारी व प्रतिष्ठित नागरिकांची बैठक बोलावून याबाबत नागरिकांची मत जाणून घेऊन मौलिक सूचना केल्या आहेत.गेल्या काही दिवसांपूर्वी स्वामी समर्थ मंदिर, संजय येवले, सुनील झंवर, किशोर गुजराती, पिरन शेख, ईश्वर पाटील, जगदंब पटेल, मनोज पिंगळे या व्यापाºयांकडे चोरी झाली आहे. पांडेनगर भागात नुकतीच गाय चोरीला गेली आहे. पण या चोरट्यांचा शोध न लागल्याने गावकºयांत या धाडशी चोरीमुळे दहशत पसरली आहे.सपोनि रवींद्र जाधव व सहकाºयांनी बुधवारी सराफाच्या दुकानात भेट देऊन सीसीटीव्ही लावणे व इतर सूचना केल्या आहेत. पण श्वानपथक किंवा नाकेबंदी किंवा दरवाजावरील ठसे वगैरे न घेतल्याने या प्रकाराचे गांभीर्य पोलिसांना आहे की नाही याबाबत जनतेतून चर्चा होत आहेत.कासोद्यातून भडगाव, पाचोरा, पारोळा, एरंडोल या दिशेने जाणारे मार्ग आहेत. या गाडीचा नंबर ८२९३ आहे. या सर्व मार्गाने त्वरित नाकाबंदी केली गेली असती तर कदाचित हे दरोडेखोर सापडले असते, अशी जाणकारात चर्चा होत आहे.दिवसभर व्यवसाय आटोपल्यावर पाच फुटी लॉकर (तिजोरी)मध्ये दागिने ठेवतो. शटरला दोन मोठे कुलूप, सेंटरलॉक आहे. नंतर चॅनल गेटदेखील आहे. एवढी काळजी आम्ही घेतो. पोलिसांची गस्त असते. तरीदेखील दरोडेखोर हा प्रयत्न करतात. याचे आश्चर्य आहे.-केशव सोनार, कासोदा 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीErandolएरंडोल