शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला सात दिवसात १९ हजार क्विंटल कपाशीची मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 17:10 IST

भोरस आणि तळेगाव या  सीसीआयच्या दोन्ही खरेदी केंद्रांवर गत सात  दिवसात  गुरुवारअखेर १९ हजार क्विंटल कापूस मोजला गेला आहे.

ठळक मुद्देदोन्ही केंद्रावर वाहनांच्या रांगा लागल्याने नोंदणी बंदमंगळवारपासून पुन्हा सुरू होईल नोंदणी

चाळीसगाव : तालुक्यातील भोरस आणि तळेगाव या  सीसीआयच्या दोन्ही खरेदी केंद्रांवर गत सात  दिवसात  गुरुवारअखेर १९ हजार क्विंटल कापूस मोजला गेला असून, सद्य:स्थितीत नवीन वाहनांची नोंदणी बंद केली आहे. दोन्ही केंद्रांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहे. मंगळवापासून पुन्हा नोंदणी करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने वाहने रांगेत उभी असल्याने मोजणीचा वेग वाढवावा. आमची गैरसोय टाळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.चाळीसगाव तालुक्यात यावर्षी कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणात आले आहे. १९ पासून तळेगाव व भोरस येथे सीसीआयची खरेदी केंद्रे सुरू झाली. गेल्यावर्षी एकच खरेदी केंद्र होते. गेल्या सहा दिवसात दोन्ही केंद्रांवर ५०० वाहने व २०० बैलगाड्यांमधून आलेला १५ हजार क्विंटल कापूस मोजला गेला. यासाठी उत्पादक शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवसांची प्रतिक्षा करावी लागत आहे. वाहने रांगेत उभी असल्याने दरदिवशी ५०० रुपयांचा भूर्दंड मात्र शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे मोजणी वेगाने करावी, असा शेतकऱ्यांचा सूर आहे. २७३ वाहने अजूनही रांगेतगत सात दिवसात १९ हजार क्विंटल कपाशीची मोजणी झाली असली तरी, भोरस आणि तळेगाव येथील खरेदी केंद्रांवर वाहनांची रांग कमी झाली नाही. भोरस येथील २०० तर तळेगाव केंद्रावर उभ्या असणाऱ्या ७३ अशा एकूण नोंदणी झालेल्या २७३ वाहनांमधील कापूस मोजणे अजून बाकी आहे. या वाहनांमधील मोजणी ३० पर्यंत होईल. रविवारी आणि सोमवारी गुरुनानक जयंती असल्याने खरेदी केंद्रे बंद राहणार आहेत. यामुळे सद्य:स्थितीत नवीन वाहनांची नोंदणी बंद करण्यात आली आहे.नवीन नोंदणी १ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठीच निर्णय घेण्यात आल्याची माहिती खरेदी केंद्रातील व्यवस्थापकांनी दिली. २७३ वाहनांमधील कपाशीची अजूनही मोजणी बाकी आहे. शेतकऱ्यांसाठी खरेदी केंद्रांवर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रतीक्षेतील वाहनांची संख्या लक्षात घेऊनच नवीन नोंदणी ३० पर्यंत बंद ठेवली आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारपासून पुन्हा नोंदणी सुरू होईल.- सतीश पाटील, प्र. सचिव, कृउबा समिती, चाळीसगाव

टॅग्स :cottonकापूसChalisgaonचाळीसगाव