शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally Live Update : ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! महाराष्ट्रभरातून मराठीप्रेमी मुंबईत, सभास्थळी मोठी गर्दी
2
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
3
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
4
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
5
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
6
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
7
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
8
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
9
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
10
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
11
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
12
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
13
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
14
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
15
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
16
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
18
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
19
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
20
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय

पारोळा येथे कापूस जिनिंगला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 15:59 IST

अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान

पारोळा - येथील पारोळा-अमळनेर रस्त्यावर असलेल्या रोहित जिनिंगला बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत सुमारे ५ हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जीन मालक अनिल सोमाणी यांनी दिली. नेमकी आग कशा मुळे लागली हे मात्र कळू शकले नाही.२७ रोजी दुपारी रोहित जिनिंग आणि प्रेसिंगमध्ये सर्वत्र काम सुरू होते. दुपारी अचानकपणे १ वाजता जिनिंगच्या दर्शनी भागात असलेल्या कापसाच्या ढिगाला आग लागली आणि सर्वांची एकच धावपळ उडाली. त्यावेळी जिनिंग परिसरात असलेल्या पाण्याचा मारा करून कामगार आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र हवेमुळे या आगीने रौद्र रूप धारण केले. त्या वेळी येथे असलेला पाच हजार क्विंटल कापूस आगीच्या भक्षस्थानी सापडला.या वेळी पारोळा, अमळनेर, धरणगाव, पाचोरा, एरंडोल येथील अग्निशमन बंब तसेच गावातील खाजगी पाणी पुरवठा करणारे टँकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही आग विझविण्यासाठी प्रयत्न केले मात्र हवा जोरात असल्याने आग विझविण्यासाठी अडचण निर्माण होते होती.या आगीत दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह जळून खाक झाले. जिनिंगचा बाजूला मजुरांची घरेही आगीत सापडली. प्रचंड धुराचे लोट असल्याने या मजुरांनी आपल्या घरातील साहित्य कसेबसे बाहेर काढले व झाडा खाली आश्रय घेतला. या वेळी दुसऱ्या एका जिनिंगचे मालक दयाराम बळीराम पाटील, सुधाकर पाटील आदींनी आग विझविण्यासाठी मदत केली.आगीचे वृत्त समजताच प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोहेकाँ प्रकाश चौधरी, सत्यवान पाटील यांच्या सह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.छाया - पारोळा येथे कापसाला लागलेली आग विझविताना नागरिक. दुसऱ्या छायाचित्रात या आगीत जळून खाक झालेले ट्रॅक्टर.

टॅग्स :Jalgaonजळगाव