शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

खान्देशात मध्य प्रदेशातील कापसाची आयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 6:39 PM

यंदा गणेशोत्सवात कापसाचा मुहूर्त साधणाऱ्या कापसाच्या खासगी बाजारपेठेत कापसाची आवक नसल्याने मुहूर्तावर जीनिंग सुरू करणाºया व्यापाºयांना कापसाची तीव्र टंचाई जाणवत आहे. परिणामी मध्य प्रदेशातील कापसाचा आधार घेतला जात आहे.

ठळक मुद्देजिनिंगचालकांना कापसाची टंचाईअपूर्ण उत्पादनाचा बसणार फटकाकापसाची अजूनही प्रतीक्षाच

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : यंदा गणेशोत्सवात कापसाचा मुहूर्त साधणाऱ्या कापसाच्या खासगी बाजारपेठेत कापसाची आवक नसल्याने मुहूर्तावर जीनिंग सुरू करणाºया व्यापाºयांना कापसाची तीव्र टंचाई जाणवत आहे. परिणामी मध्य प्रदेशातील कापसाचा आधार घेतला जात आहे. दररोज चार हजार क्विंटलपेक्षा अधिक प्रमाणात मध्य प्रदेशातून कापूस जळगाव जिल्ह्यात आयात केला जात आहे.खान्देशातील कापसाच्या खासगी बाजारपेठेत काही निवडक व्यापारी वगळता जवळपास संपूर्ण बाजारपेठेत दुर्गाेत्सव व दसºयाला मुहूर्त साधून कापसाची खरेदी सुरू होते आणि येथूनच कापूस प्रक्रिया उद्योगात जिनिग व प्रेसिंग सुरू होतात. यंदा गणेशोत्सवातच अनेकांनी मुहूर्त साधल्याने जिनिंग ही लवकर सुरू झाल्या, परंतु बाजारपेठेत शेतकºयांच्या कापसाची आवक नसल्याने कापसाची बाजारपेठ मुहूर्तावरच मंदावली आहे.खान्देशात कापूस उत्पादनात घटखान्देशात पावसाअभावी दुष्काळाचे सावट आहे. पाऊस नसल्याने कापसाच्या पिकाला मार बसला व उत्पन्न लांबले, तर बोंडअळी संकटाने उत्पन्न घटण्याचे चिन्हे आहेत तर अद्यापही पावसाची निकड कायम आहे.जाणकारांच्या म्हणण्यानुसार, वेळेवर पाऊस झाला नसल्याने पाण्याअभावी पूर्ण पोषण अगोदरच कैºया फुटत असल्याने यंदा कापसाच्या उत्पादनात २० ते २५ टक्के घट राहणार आहे. अशात हंगामाच्या प्रारंभी कापसाची आवक नसल्याने जिनिंगवर कापसाची टंचाई जाणवू लागली आहे. किमान १० ते १२ दिवस अशी परिस्थिती राहण्याचे भाकीत जाणकार व्यक्त करीत आहेत.सीसीआई व पणनच्या शासकीय खरेदीची वाट पाहणाºया शेतकºयांना कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.नर्मदा काठावर कापूस जोरातमध्य प्रदेशात सेंधवा, खरगोन, बडवाह, सनावद अशा नर्मदाकाठच्या भागात खान्देशपेक्षा १५ दिवस अगोदर कापूस जोमाने निघाला आहे, परंतु या कापसाची आर्द्रता सामान्यापेक्षा दुप्पट व तिप्पट आहे.पाठोपाठ उत्पादन जोमात असल्याने दिवसाला ४० हजार क्विंटल तेथील बाजारपेठेत आवक गाठत आहे. मध्य प्रदेशातही अद्याप सीसीआयची कापूस खरेदी सुरू झालेली नाही आणि अधिकच्या आर्द्रतेचा कापूस शासन घेत नाही. वरतून आवक जास्त असल्याने जास्त मॉइश्चर (आद्रता) असलेल्या कापसाला घट जोरात बसते. यामुळे या भागात चार हजार दोनशे ते साडेचार हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहे. इकडे जळगाव जिल्ह्यात कास्तकारांकडे अद्याप कापूस आला नाही. ज्या शेतकºयांकडे आहे ते शासकीय कापूस खरेदीची वाट पाहत आहे. परिणामी बाजारपेठेत कापसाची आवक रोडवल्याने जिनिंग बंद ठेवण्यापेक्षा नाईलाजाने मध्य प्रदेशातील हा जास्त मॉइश्चर असलेला कापूस खरेदी करून वेळ भागविली जात आहे व त्यास अठ्ठेचाळीसशे ते पाच हजारांचा भाव दिला जात आहे. दररोज तीन ते चार हजार क्विंटल कापूस मध्य प्रदेशातून बोदवड, जामनेर, मलकापूर, धरणगाव, भुसावळ तालुक्यांसह खान्देशातील जिनिंगवर येत आहे. हाच कापूस वाळवून जिनिंगवर वापरला जात आहे.मध्य प्रदेशातील नर्मदा काठच्या पट्ट्यात १५ दिवस अगोदर कापूस येतो व त्याचा आर्द्रता वजा ओलावा सामन्यापेक्षा बरीच जास्त आहे. यंदा तेथे मागणीपेक्षा अधिक उत्पादन दिसून येत आहे आणि आपल्याकडे सध्या आवक कमी आहे. जीनिंग बंद ठेवण्यापेक्षा हा कापूस वापरून तुटीतून मार्ग काढत कामकाज पुढे रेटले जात आहे.-ललित कुमार भुरडजिनिंगचालक, कुºहे पानाचे, ता.भुसावळ 

टॅग्स :cottonकापूसMuktainagarमुक्ताईनगर