शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
3
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
4
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
5
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
6
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
7
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
8
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
9
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
10
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
11
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
12
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
13
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
14
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
15
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
16
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
17
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
18
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
19
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
20
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास

वरिष्ठांनी झापल्याने नगरसेवक अडचणीत

By admin | Updated: June 9, 2014 14:07 IST

वरिष्ठांना विश्‍वासात न घेताच मनपातील सत्ताधारी खाविआचा पाठिंबा काढून घेत असल्याचे पत्रक काढण्यामागे खाविआवर दबाव आणून पद पटकाविण्याची काही नगरसेवकांची इच्छाच कारणीभूत असल्याचे समजते.

राष्ट्रवादीची धडपड : उपमहापौरपदावरून समितीच्या सभापतीपदावर तडजोडीची तयारी
जळगाव : वरिष्ठांना विश्‍वासात न घेताच मनपातील सत्ताधारी खाविआचा पाठिंबा काढून घेत असल्याचे पत्रक काढण्यामागे खाविआवर दबाव आणून पद पटकाविण्याची काही नगरसेवकांची इच्छाच कारणीभूत असल्याचे समजते. मात्र याबाबत पक्षाच्या वरिष्ठांनी झापल्यावर अडचणीत आलेल्या या नगरसेवकांनी विविध समित्यांच्या सभापतीपदांवर तडजोड करण्याची तयारी दर्शविली असल्याचे समजते.
तर राष्ट्रवादीतील काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामागे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतील इच्छुकांचा मार्ग मोकळा करण्याचे डावपेच असल्याचे सांगितले जात आहे. 
मनपाची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यावरील सर्व उपाययोजना राज्य शासनाच्या विरोधात गेलेल्या निर्णयांमुळेच रखडल्या आहेत. या परिस्थितीची जाणीव राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. त्यामुळे गटनेते व नगरसेवकांची कुठल्याही वरिष्ठ नेत्याची परवानगी न घेता वॉर्डात कामे होत नसल्याचे निमित्त पुढे करून पाठिंबा काढण्याचे पत्र देण्यामागे पदांची लालसा हेच कारण असल्याचे सांगितले जात आहे. आधी उपमहापौर व स्थायी समिती सभापती या पदांची मागणी करण्यात आली होती. मात्र परस्पर पाठिंबा काढण्याचे पत्र दिल्याच्या घडामोडींची माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानी गेल्यावर त्यांनी या हालचालीच्या सूत्रधारांना फैलावर घेतल्याचे समजते. त्यामुळे अडचणीत आलेले नगरसेवक आता समित्यांच्या सभापतीपदांवर तडजोड करण्याच्या मानसिकतेत आले असल्याचे खात्रिलायकरित्या समजते. 
तर अन्य सूत्रांकडून मात्र विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या एका उमेदवाराच्या मार्गातील अडथळा दूर व्हावा, यासाठी खाविआचा पाठिंबा काढण्याच्या हालचालींची खेळी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. 
विशेष म्हणजे जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक यांनीच ५ रोजी सकाळी ११ वाजता ही बैठक बोलावली होती. त्याच दिवशी कोर्टातही तारीख होती. ते काम आटोपून सायंकाळी ते मुंबईला रवाना झाल्याचे समजते.