शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई टाळण्यासाठी नगरसेवकांची दुकानदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 12:32 IST

गोलाणी मार्केटमधील दुकानदाराची माहिती : कारवाई टाळण्यासाठी २ हजारांची मागणी

जळगाव : लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सुरु करण्यासाठी काही नगरसेवक व जि.प. सदस्य दुकानदारांकडून पैसे वसुल करून, कारवाई होणार नाही याची शाश्वती घेत असल्याची माहिती गोलाणी व फुले मार्केटमधील काही व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’ ला दिली आहे.दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी आता मनपा प्रशासनाला अंधारात ठेवून व्यवसाय सुरु करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, याबाबत अनेकांकडून मनपाकडे तक्रार केली जात असते. त्या तक्रारीच्या आधारावर मनपाकडून कारवाई केली जात असते.ही माहिती मनपा प्रशासनाक डे जावू नये म्हणून काही नगरसेवक सक्रीय झाले असून, मनपापर्यंत दुकान सुरु असल्याची माहिती जावू नये म्हणून फुले मार्केटमधील दुकानदारांकडून विद्यमान मनपातील एक नगरसेवक व जि.प.सदस्य दिवसाला २ हजार रुपयेप्रमाणे वसुली करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.विशेष म्हणजे संबधित नगरसेवक मनपाच्या काही कर्मचाºयांना देखील संपर्कात घेवून सध्या आपली दुकानदारी चालवित असल्याची माहितीही फुले मार्केटमधील एका व्यापाºयाने दिली आहे. नगरसेवकांच्याच अशा कृत्यामुळे संतापदेखील व्यक्त केला जात आहे.-गुरुवारी झालेल्या कारवाईची टीप देखील संबधित नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनीच मनपाला दिली असल्याचीही माहिती व्यापाºयांनी दिली. फुले मार्केटमध्ये अनेक दुकाने पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सुरु असतात. मात्र, यासाठी काही नगरसेवकांना रक्कम द्यावी लागते. गुरुवारी अनेक नवीन दुकानदारांनी आपले दुकाने सुरु केले होते. मात्र, नगरसेवकाला आवश्यक रक्कम न दिल्याने त्यांच्याकडून मनपाकडे तक्रार केली गेली असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव