शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचा १५ कोटी रुपयांचा अखर्चित निधी परत जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 11:31 IST

२५ कोटींचा निधीची पुन्हा मुदत संपली : नगरोथ्थानतंर्गत येणाऱ्या ५ कोटींचाही खर्च मनपाला करता येईना

जळगाव : मार्च २०१९ पूर्वी शासनाकडून विविध योजनांसाठी प्राप्त झालेला खर्च न करता आल्याने हा अखर्चित निधी शासनाकडे परत पाठविण्याचा राज्य शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार महापालिकेचा तब्बल १५ कोटी रुपयांचा अखर्चित निधी शासनाकडे परत पाठविण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामध्ये चार वर्षांपूर्र्वी मिळालेल्या २५ कोटींमधील १० कोटी तर नगरोथ्थानतंर्गत विविध कामांसाठी मिळालेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे.मनपा व सत्ताधारी यांच्यातील समन्वयाचा अभाव, सत्ताधाऱ्यांमधील गटबाजी आणि शहरातील विकासात्मक कामांबाबत नसलेले गांभीर्य यामुळे विकासकामांसाठी आलेला निधी परत जाण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. कोरोनामुळे अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत शासनाने नवीन विकासकामांवर निधी उपलब्ध करता येणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. अशापरिस्थितीत जो निधी मनपाकडे प्राप्त होता. त्यातून विकासकामे पूर्ण करण्याची जबाबदारी होती. मनपा प्रशासनाला व सत्ताधाºयांना विकासकामांचे देखील नियोजन करता आलेले नाही. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यात २५ कोटी रुपयांच्या खर्चाची मुदत संपली होती. तेव्हा मनपाच्या मागणीनंतर ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिली होती.तीनवेळा मुदतवाढ देवूनही निधी खर्च करता आला नाही२०१७ मध्ये २५ कोटीच्या निधीला मान्यता मिळाली होती. ३१ मार्च २०१९ रोजी पहिल्यांदा मुदत संपल्यानंतर ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, त्यादरम्यानही हा निधी खर्च करता आला नाही.त्यामुळे शासनाने ३१ मे २०२० पर्यंत पुन्हा या निधीला मुदतवाढ दिली. मात्र,या सहा महिन्यात देखील महापालिकेला निधी खर्च करता आलेला नाही. त्यामुळे पुन्हा हा अखर्चित निधी शासनाकडे परत पाठवावा लागला आहे.नगरोथ्थानतंर्गत मिळालेला ५ कोटीही अखर्चीत२५ कोटींपैकी १० कोटी रुपयांचा निधी अखर्चीत आहेत. तर नगरोथ्थातंर्गत मिळालेल्या ५ कोटीधून, ४७ कामांचे २.१७ कोटी व १०० कामांचे ३.१० कोटी रुपयांचा निधीही अखर्चीत आहे. हा निधी अखर्चीत असल्याने निधी परत जाणार आहे.१०० कोटींचे भिजत घोंगडेमहापालिका प्रशासन व सत्ताधाºयांना २५ कोटी रुपयांचा निधी ३ वर्षात खर्च करता आला नाही. आॅगस्ट २०१८ मध्ये प्राप्त झालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून सत्ताधाºयांना वर्षभर कामांचे नियोजन करता आले नाही. शासनात बदल झाल्यानंतर १०० कोटींवर स्थगिती आली.एप्रिल महिन्यात १०० पैकी ४२ कोटींच्या कामांवरील स्थगिती शासनाने उठवून याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याचा सूचना केल्या. तरी अजून हा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठवला नाही. विशेष म्हणजे त्यासाठी पाठपुरावा देखील होताना दिसून येत नाही. यामुळे शहरा विकासाचे घोडे भिजतच पडले आहे.कोवीडच्या प्रादुर्भावामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये काही कामे होवू शकली नाहीत. या निधीला मुदतवाढ मिळावी यासाठी बांधकाम विभागाकडून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.-कपील पवार,मुख्य लेखाधिकारी, मनपा 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव