शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Jalgaon: ‘कोरोना’चा जळगावात शिरकाव; पहिला रुग्ण आढळल्यानं चिंतेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 10:06 IST

मेहरूण’मध्ये पहिला रुग्ण सापडल्यानं आरोग्य यंत्रणा अलर्टवर

जळगाव: जळगावात  शनिवारी ‘कोरोना’चा पहिला रुग्ण आढळला. मेहरूण येथील एका ४९ वर्षीय इसमाला ‘कोरोना’ झाल्याचा अहवाल शनिवारी सायंकाळी उशिरा आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यामुळे ‘आरोग्य यंत्रणा’ अलर्ट करण्यात आली आहे.जळगावच्या मेहरुण परिसरात राहणारा हा इसम दोन दिवसांपूर्वीच मुंबईहून आला आहे.   मुंबईत तो एका चारचाकीवर चालक म्हणून काम करतो. घशात त्रास होऊ लागल्याने शुक्रवारी दुपारी त्याला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तिथे त्याचा स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाला. त्यात तो कोरोना पॉझीटीव्ह असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तो काही दिवस दुबई येथे होता, अशी चर्चा आहे. जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी  तीन जण संशयित म्हणून दाखल झाले होते. त्यात मेहरूण येथील ४९ वर्षीय इसमाचाही समावेश होता. शुक्रवारी दाखल झालेल्या उर्वरित दोघांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण सापडल्याने जळगावात मोठीच खळबळ उडाली आहे. 

सील केलेल्या कक्षात उपचारदरम्यान, या कोरोनाग्रस्त रुग्णावर जिल्हा रुग्णालयातील नेत्रकक्षात ‘पॉझिटीव्ह’ रुग्णांसाठीच्या स्वतंत्र कक्षात उपचार सुरु  आहेत. हा कक्ष पूर्णपणे सील करण्यात आला आहे. 

पॉझिटिव्ह असलेला हा रुग्ण जळगावातील मेहरुण परिसरातील रहिवासी आहे. त्यामुळे हा भाग सॅनेटाईज करण्यात येईल. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांनाही १४ दिवस कोरोना कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात येईल.-  एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव. 

पॉझिटिव्ह अहवाल आलेला हा रुग्ण मुंबईहून परतला आहे. त्याची आणखी माहिती घेतली जात आहे. - डॉ. भास्कर खैरे, डीन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. जळगाव.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस