कोरोनाची प्रवाशांना ना प्रशासनाला भिती..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:16 AM2021-02-24T04:16:52+5:302021-02-24T04:16:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून कठोर उपाययोजना करण्यात येत असतांना, दुसरीकडे प्रशासनाचाच भाग असलेल्या एसटी ...

Corona's passengers are not afraid of the administration. | कोरोनाची प्रवाशांना ना प्रशासनाला भिती..

कोरोनाची प्रवाशांना ना प्रशासनाला भिती..

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून कठोर उपाययोजना करण्यात येत असतांना, दुसरीकडे प्रशासनाचाच भाग असलेल्या एसटी महामंडळ रेल्वे प्रशासनातर्फे कोरोनाबाबत नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांकडे स्पशेल दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी `लोकमत` प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत बसमध्ये आणि रेल्वे गाड्यांमध्येही अनेक प्रवासी विना मास्क प्र‌वास करतांना दिसून आले, तरच एकाच बाकावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्याने सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडालेला दिसून आला.

गेल्या आठवडाभरापासून सर्वत्र कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लादण्यास सुरूवात केली आहे. नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची वारंवार सुचना करण्यात येत आहे. विशेष म्हणजे नेहमी वर्दळ असलेल्या एसटी बससह रेल्वे गाड्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. असे असतांना मंगळवारी `लोकमत` प्रतिनिधीने केलेल्या पाहणी एसटी महामंडळ व रेल्वे प्रशासनातर्फे कोरोनाबाबत नियमांचे उल्लघंन करणाऱ्या प्रवाशांवर कुठलीही कारवाई होतांना दिसून आली नाही.

इन्फो :

या बसमध्ये आढळले विनामास्क प्रवासी

नवीन बस स्थानकात ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत बाहेरगावी जाण्यासाठी अनेक प्रवाशांची आगारात गर्दी दिसून आली. महामंडळातर्फे ध्वनीक्षेपणाद्वारे प्र‌वाशांना वारंवार मास्क वापरण्यात आवाहन करण्यात येत होते. मात्र, बसमध्ये पाहणी केली असता, अनेक प्रवाशी विनामास्क बसलेले दिसून आले. यामघ्ये असोद्याला जाणारी बस क्रमांक एम एच १४ बीटी १९११, शेगावहून शिर्डीकडे जाणारी बस क्रमांक एम एच ४० वाय ५६३१, धुळ्याला जाणारी एम एच १४बीटी २२३२ यासह एमएच ४० एन ९१०६, एम एच ०४ एफ के ०७०९ या बसमध्ये अनेक प्र‌वासी विनामास्क बसलेले दिसून आले. विशेष म्हणजे आसोद्याला जाणाऱ्या बसमध्ये बसण्यासाठी जागा नसतानांही प्र‌वाशांनी एकच गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे कुठलेही पालन होतांना दिसून आले नाही.

इन्फो :

आगार प्रशासनाकडूनही कारवाई नाही

आगार प्रशासनातर्फे प्रवाशांना मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात येत असतांनाही बहुतांश प्रवासी याकडे दुर्लक्ष करीत होते. मात्र, आगार प्रशासनातर्फे विमामास्क फिरणाऱ्या प्रवाशांवर कुठलीही कारवाई होतांना दिसून आली नाही. विशेष म्हणजे बसमध्ये अनेक वयोवृद्ध प्रवासी व काही तरुण विना मास्क प्रवास करत होते. तरीदेखील वाहकाने या प्रवाशांना मास्क वापण्याबाबत हटकलेदेखील नाही.

इन्फो :

रेल्वे गाड्यांमध्येही जैसे थे परिस्थिती

बसप्रमाणे रेल्वे गाड्यांमध्येही कोरोनाबाबत प्रवाशी व प्रशासनदेखील बेफिकीर दिसून आले. रेल्वे गाड्यांच्या जनरल डब्यांमध्ये तर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसून आला. तर परप्रांतातून मुंबईकडे जाणारे प्रवासी विनामास्क प्रवास करतांना दिसून आले. विशेष म्हणजे काशी एक्सप्रेस, महानगरी एक्सप्रेस व मुंबई हावडा एक्सप्रेसच्या जनरल डब्यांमध्ये तर बसण्यासाठी जागा नसल्यामुळे, प्रवासी खाली जाण्या-येण्याच्या मार्गावरही बसलेले दिसून आले. दरम्यान, एकीकडे रेल्वे प्रशासनातर्फे कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असले तरी, या ठिकाणी रेल्वे प्रशासनातर्फे या प्रवाशांवर कुठलीही कारवाई न करता बेफिकीर असल्याचे दिसून आले.

Web Title: Corona's passengers are not afraid of the administration.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.