शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना बाधिताचा मृतदेह पडून, कसे झाले अंत्यसंस्कार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 12:54 IST

जळगाव : एका ४५ वर्षीय बाधिताचा मृतदेह उचलण्यास कोविड रुग्णालयात कोणीच तयार नव्हते. शेवटी बाहेर बसलेल्या तरुणांना एक हजार ...

जळगाव : एका ४५ वर्षीय बाधिताचा मृतदेह उचलण्यास कोविड रुग्णालयात कोणीच तयार नव्हते. शेवटी बाहेर बसलेल्या तरुणांना एक हजार रुपये देऊन हा मृतदेह उचलून अंत्यसंस्कार करण्यात आले. हा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी घडला.जळगावच्या कोविड रुग्णालयात बाधितांच्या मृतदेहाची हेळसांड होत असल्याचे प्रकार या आधीही समोर आले आहेत. या मृतदेहांना हात लावायला किंवा उचलायला कुणी तयार होत नव्हते? त्यामुळे सुरूवातीच्या काळात हे मृतदेह बराच वेळ रुग्णालयात पडून राहत होते़ एका बैठकीत ही सर्व जबाबदारी पालिकेची असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले होते़ मध्यंतरीच्या काळात नातेवाईकांकडेच मृतदेह सोपविले जात असल्याचा प्रकार घडला होता़किनगाव ता. यावल येथील एका ४५ वर्षीय बाधित रुग्णाला आठवडाभरापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ शनिवारी या रुग्णाचा मृत्यू झाला़ दरम्यान, रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास या रुग्णालयातील शिपाई मृतदेह उचलण्यासाठी नातेवाईकांना बोलवत होते़ मात्र, बाधितांच्या मृतदेहांमुळे प्रचंड संसर्ग वाढल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे नातेवाईकांना मृतदेह उचलण्यासाठी कसे बोलावले जावू शकते, असा प्रश्न सर्वांना पडला़ त्यानंतर मृतदेहाला हात लावायला कोणी तयार नसल्याने अखेर रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या काही तरुणांना एक हजार रुपये देण्यात आले. या मुलांनी हॅन्डग्लोज घालून मृतदेह रुग्णवाहिकेत टाकला़ यानंतर स्मशानभूमीत कर्मचारी थांबून होते़ त्यांनीच अंत्यसंस्कार केले़ यावेळीही तीन हजार रुपये द्यावे लागल्याचे नातेवाईकांनी सांगितले़

टॅग्स :Jalgaonजळगाव