शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

१५ तज्ज्ञांकडून होणार कोरोना सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 12:58 IST

२१ रोजी पाहणी : ठिकठिकाणी होणार ४००जणांची तपासणी

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा संचालनालय पुणे यांच्या अंतर्गत ‘नॅशनल सेरो सर्व्हे’ केला जाणार असून यासाठी १५ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले पथक २० रोजी जिल्ह्यात दाखल होणार असून २१ मे रोजी जिल्ह्यातील दहा गावांमध्ये प्रत्येकी ४० अशा ४०० जणांची तपासणी करणार आहे़राज्यात १८ ते २२ या कालावधीत सहा जिल्ह्यांमध्ये हे सर्व्हेक्षण केले जाणार आहेत़ यासाठी विविध पथक तयार करण्यात आल्या असून या पथकातील प्रमुखांना सहकार्य म्हणून जिल्हा रुग्णालय व स्थानिक आरोग्य यंत्रेणेतील ज्यांना रक्ताचे नमुने घेता येतात असे तंत्रज्ञ घेतले जाणार आहे़ यात १० वैद्यकीय अधिकारी व १० तंत्रज्ञांची नियुक्ती करण्याचे आदेश रविवारी संध्याकाळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांनी दिले. हे पथक जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपाययोजनंचा आढावाही घेणार आहे़ आयसीएमरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा या पथकांमध्ये समावेश असणार आहे़या पथकांना वाहने, पीपीई किट, मास्क आदी बाबी उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र पाठविण्यात आले आहे़ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे़दरम्यान, गावांची निवड ही शासनाकडूनच झालेली असून दहा टीम दहा गावांमधूनच नमुने घेऊन जाणार आहेत, अशी माहिती डॉ़ चव्हाण यांनी दिली़या ठिकाणी तपासणीयावल तालुक्यातील मोहराळे, रावेर तालुक्यातील तांदलवाडी, जळगाव तालुक्यातील कडगाव, धरणगाव, भडगाव तालुक्यातील वरखेडे, पाचोरा येथील नाईकनगर, जामनेर येथील गोराडखेडा, भुसावळ येथील वॉर्ड नं ४५, जळगाव येथील वॉर्ड नं ५७, चाळीसगाव येथील वॉर्ड नं २८ या ठिकाणच्या रँडमली दहा घरंची निवड करून प्रत्येकी चार अशा चाळीस जणांची प्रत्येक गावातून तपासणी केली जाणार आहे़कोरोनाचा आढावाकोणाला कोरोना होऊन गेला आहे का? त्यांच्यात प्रतिकार शक्ती किती, विकसित झाली, या बाबी या तपासणीतून समोर येणार आहे़ या तपासणीचे अहवाल काही वेळाने होणार प्राप्त होतील, जिल्ह्यात चारशे जणांची अशी तपासणी होणार आहे़ पंधरा दिवसानंतर पुन्हा तपासणी घेण्यात येणार आह़े त्यानंतर महिन्याच्या अंतराने ही तपासणी होणार असल्याची माहिती आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव