शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

फैजपुरात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 13:13 IST

उपाययोजनांना वेग : पोलीस अधिकाºयानंतर आणखी एक नागरिक बाधित

फैजपूर, ता. यावल : यावल तालुक्यातील फैजपूर येथील पोलीस अधिकारी कोरोना बाधित झाल्याचे स्पष्ट होताच त्याच्या काही तासानंतर शहरात आणखी एक रुग्ण कोरोना बाधित असल्याचे प्रशासनाने शनिवारी सकाळी जाहीर केले. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांची संख्या दोन झाली आहे. कोरोनाबाधित दोघी महिलांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर कोरोनामुक्त झालेल्या फैजपूर शहरात कोरोनाने पुन्हा शिरकाव झाला आहे.दरम्यान पोलीस अधिकारी राहत असलेला शिवाजीनगर परिसर पालिका प्रशासनाने सील करण्यास सुरुवात केली असून त्यांच्या परिवाराला क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी सांगितले. तसेच फैजपूर पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांची सुद्धा वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.फैजपूर येथील पोलीस अधिकारी कोरोना बाधीत झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शुक्रवारी रात्री या अधिकाºयाला जळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले. यावेळी त्यांना धीर देण्यासाठी स्वत: डीवायएसपी नरेंद्र्र पिंगळे तसेच मुख्याधिकारी किशोर चव्हाण आदी उपस्थित होते.शनिवारी सकाळी शहरातील आणखी एका जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर हा बाधित रुग्ण राहत असलेला एक किलोमीटर परिघाचा परिसर पालिका प्रशासनाने सील करण्यास सुरुवात केली आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना क्वांरंटाईन करण्यात येणार असून परिसरातील सर्व घरांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिले आहे.शहरातील व्यापार व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत असताना रुग्णांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब असल्याने शहरवासीयांनी नियमांचे पालन करत प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी केले आहे

टॅग्स :Jalgaonजळगाव