शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कोरोनापाठोपाठ डेंग्यूचा ताप, उटखेड्यात आढळले रुग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 18:40 IST

गावात घबराट, आरोग्य विभागाने हाती घेतली तपासणी मोहीम

उटखेडा, ता. रावेर :    येथे डेंग्यू सद्श्य रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे  यामुळे  ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे .  डासांच्या प्रादुर्भावाने होणाऱ्या डेंग्यूमुळे उटखेडेकरांना होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. नऊ दिवसांपूर्वी प्रथम एका दहा वर्षाच्या मुलाला डेंग्यू हा आजार आढळल्याने त्याचा उपचार रावेर येथील करण्यात आला. यानंतर त्याच परिसरात चार दिवसांपूर्वी एका आठ वर्षीय मुलालासुध्दा डेंग्यू झाला असून रावेर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.आढळल्या डेंग्यूच्या अळ्याडेंग्यूचे रुग्ण सापडत असल्याने प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या पथकाने गावात मोहीम राबविली. या मोहिमेत कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. त्या वेळी आठ ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या सापडल्या असून पाण्याच्या टाक्या रिकाम्या करण्यात आल्या. कोरोनानंतर डेंग्यूचा शिरकाव झाल्याने आरोग्य उपकेंद्र सतर्क झाला आहे. ग्रामस्थांनी कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन उपकेंद्राचे डॉ. कैलास सरोदे यांनी केले आहे. जास्त दिवस पाणी संग्रही ठेवू नये, घर व परिसर स्वच्छ ठेवा, अशा सूचना देण्यात आल्या. पाणी उकळून व स्वच्छ करून प्यावे, शिळे अन्न खाऊ नये, असे आवाहन केले. यावेळी विजय नेमाडे (मलेरिया सुपरवायझर), सुभाष ठाकूर,  बी.ए. तडवी, रुखया तडवी, सिंधूबाई पाटील, शबनम तडवी आदी उपस्थित होते.