जळगाव : महाराष्ट्र दिनानिमित्त जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक अधीक्षक डाॅ पंजाबराव उगले, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, प्रांताधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार रवी मोरे उपस्थित होते.कोरोनच्या पार्श्वभूमीवर केवळ जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य ध्वजारोहण झाले. इतर ठिकाणी कोठेही ध्वजारोहण होऊ शकले नाही. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या इतिहासात जळगाव येथे प्रथमच केवळ एकाच ठिकाणी ध्वजारोहण झाले.
Corona Effect : महाराष्ट्र स्थापनेच्या इतिहासात प्रथमच जळगाव येथे केवळ एकाच ठिकाणी ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 09:54 IST