शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

कोरोनामुळे मूर्तीकारांच्याच व्यवसायात विघ्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 11:47 IST

आर्थिक कोंडी : सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींची आॅर्डरच नाही, केवळ घरगुती गणेशमूर्तींवर भर

जळगाव : ज्या गणेशोत्सवाच्या आनंदात भक्तगण तल्लीन होऊन जातो, त्या विघ्नहर्त्याची मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकारांच्याच व्यवसायात यंदा विघ्न आले आहे. कारण पैसे खर्चूनही कच्चा माल मिळत नाही, परप्रांतिय कामगार तर केव्हाच घरी गेलेत. त्यामुळे स्थानिक कामगारांना घेऊनच कामे उरकावी लागत आहेत. त्यातच गणेशोत्सव अडीच महिन्यांवर आला असताना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची एकही आॅर्डर न आल्याने यंदा घरगुती गणेशमूर्तींवरच व्यवसाय चालवण्याची वेळ मूर्तीकारांवर आली आहे.जळगाव शहरात जवळपास गणेशमूर्ती बनवण्याचे २० मोठे कारखाने आहेत तर ५० ते ६० छोटे कारखाने आहेत. मोठ्या कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती बनवण्याचे काम वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारीतच सुरु होते. सुरुवातीला घरगुती गणेशमूर्ती बनवल्या जातात आणि होळी झाल्यानंतर गणेश मंंडळांच्या मोठ्या गणेशमूर्ती बनवण्याच्या कामाला सुरुवात होते. यंदा याचदरम्यान या व्यवसायात विघ्न आले अन् कोरोनामुळे अवघा देश ‘लॉकडाउन’ झाला. पर्यायाने सर्वच व्यवसाय ठप्प होऊन गेले. त्याचा मोठा फटका गेले दोन महिने गणेशमूर्ती व्यवसायाला बसतो आहे. घरगुती गणेशमूर्तीचे काम जानेवारीपासून सुरु झाले. मात्र गणेशमंडळांच्या मूर्तींचे काम सुरु होणार, तेवढ्यातच लॉकडाउन झाल्याने हे कामच ठप्प झाले आहे. मूर्तींसाठी लागणारा कच्चा मालही येत नसल्याने आणि यंदा आजपर्यंत मोठ्या मूर्तीची आॅर्डरही न आल्याने मूर्तीकार चिंतेत पडले आहेत.संभ्रमामुळे आवडीला ब्रेक; उत्साहालाही लगामगणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक मोठा उत्सव असतो. त्यामुळे त्याचा उत्साह हा दरवर्षी आणखीन व्दिगुणित होतो. मात्र यंदा कोरोनामुळे अजूनपर्यंत शासनाने गणेशोत्सवाबद्दल कोणतीच भूमिका जाहीर न केल्याने मूर्ती सांगायच्या की नाही, इथपासून ते अगदी यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा हाणार की नाही, असे अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. त्यामुळे मंडळांनीही यंदा अजूनही गणेशमूर्तीची आॅर्डर दिलेली नाही.दरवर्षी आमच्या कारखान्यात २५०० ते ३ हजार घरगुती गणेशमूर्ती बनतात. मात्र यंदा केवळ दीड हजार गणेशमूर्ती बनवण्यात आल्या आहेत. कच्चा माल नाही अन् आॅर्डरही नाही. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात मूर्तीकार आर्थिक संकटात सापडला आहे. गणेशोत्सवाबाबत शासनाने अजूनही भूमिका न मांडल्याने मंडळांच्या आॅर्डर्स अजूनही आलेल्या नाहीत. तरीही आम्ही काही मोठ्या मूर्ती बनवण्याचे नियोजन करत आहोत. आमच्या मूर्तीशाळेत दरवर्षी ३०० मोठ्या मूर्ती असतात. यंदा मात्र एकही आॅर्डर नाही.-राजू वसंत पाटील, मूर्तीकार, शिवाजीनगर, जळगावकाही व्यवसाय तर पूर्णच बुडालेमोठे मूर्तीकार हे जानेवारीपासून मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरुवात करतात. मात्र छोटे मूर्तीकार हे वीटभट्टीचे काम संपले की हे काम सुरू करतात. मात्र त्यांचे मूर्ती घडवण्याचे काम सुरू होण्यापूर्वीच लॉकडाउन सुरू झाले, त्यामुळे अजूनही त्यांच्या कामाला सुरुवात झालेली नाही.परप्रांतीय कामगार परतलेगणेशमूर्तींचे काम सुरू झाल्यानंतर लॉकडाउन सुरू झाले, त्यामुळे या व्यवसायात असलेले परप्रांतीय कामगार आपापल्या घरी परतले आहेत. जळगावात मध्यप्रदेशातील रानपूर, खंडवा येथून तसेच राज्यस्थानचे कारागीर येतात. हे कारागीर कच्चा माल तयार करून देण्याचे काम करतात. मात्र यंदा हे काम स्थानिकांना करावे लागणार आहेत. यातील राज्यस्थानच्या कारागिरांचे जळगावात स्वत:चे कारखानेही आहेत तर काहीजण दुसºया मूर्तीकारांकडे काम करतात.मूर्ती महागणारयंदा कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती तसेच लॉकडाउनमुळे वाहतुकीसाठी वाढलेला खर्च यामुळे मूर्ती २० ते २५ रुपयांनी महागणार आहेत. घरगुती गणेशमूर्ती या दरवर्षी १२५ रुपयांपासून ते अगदी ९०० रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध असतात.कच्चा कालही मिळेनागणेशमूर्तीसाठी पीयुपी हे राज्यस्थान येथून मागवले जाते तर मोठ्या मूर्तींसाठी लागणारा काथ्या हा तामिळनाडू व राज्यस्थान येथून मागवला जातो. यंदा पैसे देऊनही हा कच्चा माल मिळत नसल्याने मोठ्या मूर्तींची आॅर्डर आली तरी ती पूर्ण कशी करणार? असा प्रश्न मूर्तीकारांसमोर आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव