शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात कोरोनाचा विस्फोट, ५५ नवे बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 12:00 IST

तीन बाधितांचा मृत्यू : संसर्ग वाढला

जळगाव : शहरात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला असून शुक्रवारी शहरात तब्बल ५५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे़ शहराची रुग्णसंख्या ८५१ वर पोहोचली आहे़ दरम्यान, तीन बाधितांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्याही ४८ झाली आहे़ शहरात वाढणारी गर्दी नियंत्रणात आणण्याची गरज असल्याचे मत यामुळे समोर येत आहे़शुक्रवारी पुन्हा एकदा जिल्हाभरातील सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहे़ गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील रुग्णसंख्या अगदीच झपाट्याने वाढली असून कोरोनाचा कहर थांबत नसल्याचे चित्र आहे़ शहरातील विवेकानंद नगर नवे हॉटस्पॉट ठरत आहे़ यासह शिवाजीनगरात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे़ शहरातील सर्वच भागांमध्ये कोरोनाचा कमी अधिक प्रमाणात शिरकाव झालेला असून नागरिकांनी आता अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे़ शुक्रवारी शहरातील तीन बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ यात ५५, ७० व ५९ वर्षीय पुरूषांचा समावेश आहे़ शुक्रवारी जिल्हाभरातील सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद असून यातील ५ मृत्यू हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव तर एक मृत्यू गोल्डसिटी रुग्णालयात झाला आहे़ मृतांमध्ये जळगाव शहर ३, बोदवड एक ५५ वर्षीय प्रौढ, पाचोरा व जामनेर येथील अनुक्रमे ४० व ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे़जिल्ह्यातील रहिवासी असलेले मात्र, अन्य जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची नोंद ही आपल्या जिल्ह्यातील फॅसिलिटी अ‍ॅपमध्ये करता येत नाही़ रुग्ण ज्या जिल्ह्यात बाधित आढळून आलेला असून मृत्यू झालेला आहे, त्या जिल्ह्यातील अ‍ॅपमध्येच ही नोंद होते़ ११ रुग्णांचा मृत्यू हा बाहेर जिल्ह्यात झाल्यामुळे ती नोंद त्याच जिल्ह्यात करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण सामान्य जिल्हा रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे़या ठिकाणी आढळले रुग्णविवेकानंद नगर, शिवाजी नगर प्रत्येकी ५, हिरा शिवा कॉलनी २, तुकाराम वाडी, गेंदालाल मिल, मयूर कॉलनी, जीवनमोती सोसायटी शिरसोली रोड, गणेश नगर, आदर्श नगर या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले असून अन्य रुग्णांच्या घराचे पत्ते समोर आले नव्हते़तपासणी वाढल्याने रुग्ण येताय समोरजिल्हाभरात तपासणींची संख्या वाढविण्यात आली असून अहवाल येण्याचे प्रमाणही वाढल्याचे चित्र आहे़ शुक्रवारी एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण आढळून आले मात्र, दुसरीकडे ६५६ अहवाल निगेटीव्हही आलेले आहेत़ असे एकूण ८६५ अहवाल एका दिवसात प्रशासनाला प्राप्त झाले असून शुक्रवारी पुन्हा ८५४ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव