शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडून देण्यात आलेल्या निर्वाणीच्या इशाऱ्यामुळे अ‍ॅडमिन सावध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 16:24 IST

बहुतांश ग्रुप अ‍ॅडमिन यांनी केवळ आपली पोस्ट शेअर करत येईल, अशी सेंटीग केली आहे.

ठळक मुद्देकारवाईच्या भीतीने सावध भूमिका ग्रुप अ‍ॅडमिन घेताय खबरदारीकोरोना इफेक्ट

डिगंबर महालेअमळनेर, जि.जळगाव : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्वच जण रिकामे बसले आहेत. हल्लीच्या काळात ‘रिकामे मन सोशल मीडियाचे धन’ म्हटल्यास वावगे ठरू नये. परिणामी कोरोना आणि एकूणच स्थिती यावर अनेकांनी वस्तुस्थितीजन्य (रियल) क्लिप्स, टिक टॉक, जोक्स, मार्गदर्शक मेसेजेसचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. अजूनही या पावसात बºयापैकी सर्वांना भिजविणे काहींनी सुरूच ठेवले आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी राज्य सायबर सेलचे पोलीस उपमहानिरीक्षक हरीश बैजल यांची सोशल मीडिया विशेषकरून व्हॉट्सअ‍ॅपवरून प्रसारित होणाºया कोरोनाबद्दलच्या संदेशांवर नियंत्रण आणण्यासाठीची क्लिप व्हायरल झाली. त्याचा परिणाम म्हणून सर्वच अ‍ॅडमिन्सचे धाबे दणाणले आहे .खरे तर व्हॉॅट्सअ‍ॅप ग्रुपवरून आलेले संदेश खातरजमा न करता पुढे पाठवण्याचे प्रकार सर्रास घडत असल्याने वादाचे प्रसंगदेखील निर्माण झाले आहेत. त्यामुळे सायबर सेलकडे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून प्रसारित होणाºया संदेशांवर लक्ष ठेवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.ग्रुप अ‍ॅडमिनने आपल्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये बदल करत इतर सदस्यांना संदेश पाठवण्यापासून रोखावे. आपल्याला येणाºया संदेशाची खातरजमा करूनच पुढे पाठवण्याची खबरदारी घ्यावी. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून एखादा समाज विघातक संदेश किंवा अफवा पसरवणारा संदेश प्रसारित झाला तर त्याला व्यक्तिगतरित्या जबाबदार धरण्याचा इशारा बैजल यांनी दिला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा जंग जंग पडत असताना सोशल मीडियामधून मात्र उलट सुलट संदेश प्रसारित करून अफवांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सायबर सेलने थेट कारवाईचा इशारा दिल्यानंतर अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिन्सचे धाबे दणाणले आहे. त्यांच्याकडून ग्रुपची सेटिंग बदलण्यात येत आहे. काही ठिकाणी बनविण्यात आलेले ग्रुपदेखील धडाधड डिलीट केले जात आहेत.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील आपापल्या कार्यक्षेत्रात जमावबंदी व संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. अशा परिस्थितीत सोशल मीडिया विशेषकरून व्हॉट्सअ‍ॅपवरून प्रसारित होणा-या कोरोनाबद्दलच्या संदेशांवर नियंत्रण नसल्याने अनेकदा अफवांचे पेव फुटून उलटसुलट चर्चांना उधाण आल्याच्या घटना घडल्या आहेत. इतर व्हॉॅट्सअ‍ॅप ग्रुपवरून आलेले संदेश खातरजमा न करता पुढे पाठवण्याचे प्रकार सर्रास घडत असल्याने वादाचे प्रसंगदेखील निर्माण झाले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सायबर सेलकडे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून प्रसारित होणाºया संदेशांवर लक्ष ठेवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.अनेक ग्रुप अ‍ॅडमिनने आपल्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये बदल करत इतर सदस्यांना संदेश पाठवण्यापासून रोखले आहे.सध्याच्या काळात सोशल मीडिया व विशेषकरून व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना सबुरीचा सल्ला घेण्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आल्याने आता प्रत्येक जण आपल्याला येणाºया संदेशाची खातरजमा करूनच पुढे पाठवण्याची खबरदारी घेत असल्याचे दिसून येत आहे.राज्याच्या विविध भागात पोलीस अधिकाºयांकडून ग्रुप अ‍ॅडमिनला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून एखादा समाज विघातक संदेश किंवा अफवा पसरवणारा संदेश प्रसारित झाला तर व्यक्तिगत जबाबदार धरण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिन्सवरच संक्रांत आली आहे.काहींना या निबंर्धांविषयी फारशी कल्पना नसल्याने अजाणतेपणी त्यांनी व्हायरल केलेल्या मॅसेजेसमुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याने अशी मंडळी निष्कारण त्रासात सापडली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJamnerजामनेर