शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

‘कोरोना’चा शेतीलाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 14:25 IST

कोरोनाचा सुप्त प्रभाव टिकून राहण्याची भीती केळी उत्पादकांमधून व्यक्त होत असल्याने केळी लागवडीत घट होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे कोरोनाचा सुप्त प्रभाव टिकून राहण्याची भीती रावेरमध्ये कापसाचा पेरा ८ हजार हेक्टरने घटण्याची भीतीमका ३ हजार २५१ हेक्टर घटण्याचा कृषी विभागाचा अंदाज

किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : गतवर्षी कापसाचे उत्पादन निम्म्यावर घटल्याने यंदा जिरायत व बागायत कापसाची लागवड आठ हजार हेक्टरने, तर रब्बीतील मका उत्पादनाची झालेली मातीमोल परवड पाहता मक्याचे क्षेत्र तीन हजार २५१ हेक्टरने खरीप पीक घटण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. यंदा केळीबागांचे उत्पादन गुणात्मक दर्जाचे असता नव्हे तर काहींनी निर्यातीचे फळनिगा तंत्र अवलंबूनही कोरोनाच्या बागूल बुवात उत्पादन खर्च खिशात पडला नसल्याने केळी लागवडीत घट निर्माण होण्याची शक्यता असून, हळद व अद्रक उत्पादनाकडे केळी उत्पादक शेतकरी वळण्याची दाट शक्यता आहे.रावेर तालुक्याचे खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ४६ हजार २१५ हेक्टर आहे. त्यात २८ हजार ३६५ हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी होणार असल्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. उर्वरित क्षेत्रात केळी, ऊस, हळद, अद्रक आदी बागायती क्षेत्राचा समावेश राहील.तथापि, ‘मे हिट’चा तडाखा ऐन उत्तरार्धात ४६ सेल्सिअंशावर सूर्य आग आहे. त्यामुळे कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये ‘मे हिट’ची भर पडल्याने रस्ते निर्मनुष्य होऊन शेतीशिवारातील पूर्व हंगामी कापूस लागवड व खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीवर विपरित परिणाम झाला आहे. प्रचंड उष्मा व कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे पूर्व हंगामी कापूस लागवडीला यावर्षी गत वर्षीच्या तुलनेत उशीर झाला आहे. गतवर्षी कापसाच्या डबल बीटी बियाण्यांची लागवड करूनही व उत्पादन खर्च भरमसाठ करूनही बागायती कापसाचे उत्पन्न जिरायत कापसाप्रमाणे आल्याने तर जिरायत कापसाचे त्याहून निम्मे आल्याने तथा कापूस लागवडीचा हंगाम येईपर्यंत मागील वर्षाचे उत्पादन घरात पडून असल्याने यंदा कापसाच्या लागवडीचे क्षेत्र घटण्याचा अंदाज कृषी विभागाचा अंदाज आहे. बागायती कापसाचे एक हजार ३५२ हेक्टर तर जिरायत कापसाचे ६ हजार ७२० हेक्टर असे एकूण ८ हजार ७२ हेक्टर क्षेत्र घटणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.दरम्यान, रब्बी हंगामात मक्याच्या उत्पादनाला मातीमोल भावाने विकावे लागल्याने यंदा खरिपाच्या मक्याच्या लागवडीतही तीन हजार २५१ हेक्टरने घट होण्याचा अंदाज आहे.दरम्यान, लॉकडाऊनचा बागुल बुवा करून केळी व्यापाऱ्यांनी निर्यातक्षम व गुणात्मक दर्जाच्या केळी मालीचीही धुळघाण केल्याने व कोरोनाच्या सावटाची अनिश्चितता गृहीत धरून बहुतांशी केळी उत्पादक हळद व अद्रक उत्पादनाकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कापसाच्या उत्पादनाचे भिजत घोंगडे पडून असल्याने शेतकऱ्यांना ज्वारी, मका, कडधान्य व तेलबिया पिकांकडे वळण्याची गरज आहे. अतिउष्ण तपमान व बियाण्यांची उशिराने होणारी उपलब्धता पाहता कापसाच्या लागवडीत घट होण्याचा अंदाज आहे. कोरोनाचा सुप्त प्रभाव टिकून राहण्याची भीती केळी उत्पादकांमधून व्यक्त होत असल्याने केळी लागवडीत घट होण्याची शक्यता आहे.-एस.आर.साळुंखे, तालुका कृषी अधिकारी, रावेर 

टॅग्स :FarmerशेतकरीRaverरावेर