शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

Ganesh Chaturthi 2018 : जळगावात गणपतीच्या वर्गणीतून साईबाबांच्या मंदिराचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 12:30 IST

जिल्हा रुग्णालय परिसरातील स्तूत्य उपक्रम

ठळक मुद्देनिवासस्थान पाडल्यानंतरही गणेशोत्सवात खंड नाहीगणरायाच्या लहान मूर्तीची स्थापना

जळगाव : जिल्हा रुग्णालयातील निवासस्थाने पाडल्यानंतर तेथे कोणीही राहत नसले तरी गणेशोत्सवात खंड पडू न देता कर्मचाऱ्यांनी यंदाही लहानशा गणपती मूर्तीची स्थापना केली आहे. यासाठी जमा झालेली वर्गणी सत्कारणी लावण्यासाठी येथील गणेशभक्तांनी रुग्णालय परिसरात असलेल्या श्री इच्छापूर्ती साई गणेश मंदिराचा कायापालट केला आहे.जिल्हा रुग्णालय परिसरातील निवासस्थानांमध्ये राहणाºया कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा रुग्णालय परिसरात गणेशोत्सव साजरा केला जात होता. यामध्ये कर्मचाºयांसह त्यांचे कुटुंब उत्साहाने सहभागी होऊन गणरायाची पूजा-अर्चा करीत असत. मात्र जिल्हा रुग्णालय परिसरातील निवासस्थाने जीर्ण झाल्याने ती पाडण्यात आली. त्यानंतर हा पहिलाच गणेशोत्सव आला. आता निवासस्थानातील रहिवासी नसल्याने यंदा गणेशोत्सवात खंड पडतो की काय असे अनेकांना वाटत होते, मात्र दरवर्षी जे कर्मचारी वर्गणी देत असत त्यांनी यंदाही वर्गणी दिली. वर्गणी जमा झाली तरी निवासस्थानात कोणी नसल्याने गणरायाची देखभाल, पूजा-अर्चा कोण करणार असा प्रश्न होता. त्यासाठी सर्वांनी एकमत करीत गणरायाची लहान मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.....अन् साईबाबा मंदिराचे पालटले रुपगणरायाची लहान मूर्ती स्थापन करून गणेशोत्सवात खंड तर पडू दिला नाही, मात्र जमा झालेल्या निधीचे काय करावे, असा प्रश्न होता. त्यासाठी जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी बापू बगलाणे यांनी पुढाकार घेत रुग्णालय परिसरातील श्री इच्छापूर्ती साई गणेश मंदिराला रंगरंगोटी करण्यासह फरशी, टाईल्स बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली व मंदिराचा कायापालट झाला.२००६मध्ये हे मंदिर बांधलेले असून त्या ठिकाणी रुग्णाचे अनेक नातेवाईक येऊन जेवण करतात व विसावा घेतात. मात्र त्यांना अधिक व व्यवस्थित जागा मिळावी याचाही आता काम करताना विचार करण्यात आला.कर्मचाºयांनी वेगवेगळ््या ठिकाणी जावून चांगल्या दर्जाची व आकर्षक टाईल्स आणून मंदिरात ती बसवून रंगरंगोटी केली. या सोबतच परिसरात हॅलोजन दिवे (लाईट) बसविण्यासह आकर्षक रोशनाई करण्यात आली. यामुळे मंदिर उजळून निघाले असून याच ठिकाणी गणरायाच्या लहान मूर्तीची स्थापना केली आहे.मंदिराच्या समोर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी फरशी बसलविण्यात आली असून बाकडे तयार करण्यात आले. त्याचा रुग्णांना मोठा फायदा होत असून गणपतीच्या वर्गणीतून जमा झालेल्या रकमेचा सद्पयोग केल्याबद्दल रुग्णाचे नातेवाईकही या उपक्रमाचे कौतूक करीत आहेत.रुग्णवाहिका चालक करतात देखभालसाईबाबा मंदिरात गणरायाची स्थापना केल्यानंतर यंदा १०८ रुग्णवाहिकेचे चालक राजू पाटील व त्यांचे सहकारी गणरायाची पूजा-अर्चना करीत आहे.गणरायाच्या वर्गणीतून साईबाबांच्या मंदिराच्या कामासाठी बापू बगलाणे यांच्यासह जितेंद्र करोसिया, अनिल सपकाळ, सुधीर करोसिया, मंगेश बोरसे, दिलीप सुरवाडे, प्रवीण कोल्हे, गोपी चिरामंडे, चेतन छजलाणे, सुभाष सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Jalgaonजळगाव