शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अवाक्याबाहेर गेलेले सिमेंटचे दर नियंत्रणात आणा - ‘क्रेडाई’चे पालकमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 11:25 IST

मागणी

जळगाव : बांधकाम व्यवसायातील महत्त्वाचा घटक असलेल्या सिमेंटच्या किंमती अवाक्याबाहेर गेल्या असून यामुळे बांधकामाचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे. सिमेंटची ही अवाजवी भाववाढ कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी ‘क्रेडाई’ या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली.पालकमंत्री पाटील हे १ मे रोजी जळगाव दौऱ्यावर आले असताना ‘क्रेडाई’ सोबत त्यांची बैठक झाली. त्या वेळी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात सिमेंटची अवाजवी भाववाढ हा प्रमुख मुद्दा ठरला. त्यावर उत्तर देताना पालकमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली. या मागणीसह सिटी सर्व्हे कार्यालयात मनुष्यबळ कमी असल्याने या ठिकाणी कामांना बराच वेळ लागत असल्याने पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे तसेच शहरांच्या विकासासाठी राबविण्यात येणाºया विकास नियंत्रण नियमावलीमध्ये छोट्या शहरांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.या वेळी संघटनेचे राज्य सहसचिव अनिश शाह, जळगाव शाखेचे अध्यक्ष निर्णय चौधरी, सचिव पुष्कर नेहेते, धनंजय जकातदार, प्रवीण खडके, श्यामकांत राणे आदी उपस्थित होते.यंत्रणेतील त्रुटी दूर कराया वेळी आर्कीटेक्ट असोसिएशननेदेखील पालकमंत्र्यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या. यात बांधकामाच्या मंजुरी प्रक्रियेसाठी मनपामध्ये सुरू करण्यात आलेली आॅनलाईन प्रणाली बाल्यावस्थेत असल्याने मंजुरी प्रक्रियेसाठी जास्त वेळ लागतो. या प्रणालीतील त्रुटी दूर होईपर्यंतआॅनलाईनसह मॅन्युअली पद्धतही सुरू ठेवावी, अशी मागणी करण्यात आली.या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर चोपडे, ललित राणे, प्रकाश गुजराथी आदी उपस्थित होते.कृत्रिम वाळूला प्रोत्साहन मिळावेसिव्हील इंजिनिअर असोसिएशनच्यावतीने दिलेल्या निवेदनात कृत्रिम वाळूला प्रोत्साहन मिळावे, अशी मागणी करण्यात आली. या वेळी मिलिंद राठी, तुषार तोतला आदी उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव