शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
3
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
4
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
5
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
6
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
7
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
8
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
9
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
10
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
11
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
12
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
13
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
14
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
15
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
16
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
17
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
18
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
19
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
20
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा

तुळजाभवानी मंदिरावर सरकारचेच नियंत्रण

By admin | Updated: April 20, 2015 13:03 IST

तुळजापूर : येथील श्री तुळजाभवानी मंदिराच्या कारभारावर राज्य सरकारने पूर्ण नियंत्रण मिळविले आहे.

तुळजाभवानी मंदिरावर सरकारचेच नियंत्रणउच्च न्यायालय : पुजार्‍यांची याचिका फेटाळलीतुळजापूर : येथील श्री तुळजाभवानी मंदिराच्या कारभारावर राज्य सरकारने पूर्ण नियंत्रण मिळविले आहे. या संदर्भात प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसूचनेला आव्हान देणार्‍या याचिकेस अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नकार दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ मे रोजी होणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचा कारभार निजाम राजवटीने १९०९ पासून घालून दिलेल्या देऊळ-ए-कवायत या नियमानुसार सुरू होता. त्यामुळे मंदिराच्या विश्वस्त मंडळाची नोंद धर्मादाय न्यासाकडे असली तरी मंदिराचे सर्व व्यवहार यात नमूद केल्याप्रमाणेच सुरू होते. मंदिराच्या पुजार्‍यांचे हक्क, विविध विधी, भाविकांनी अर्पण केलेल्या देणगी आणि रोख रकमेत असलेले पारंपारिक हक्क तसेच त्याचा विनियोग आदींबाबतचे निर्णय या नियमावलीनुसार घेण्यात येत होते. मात्र, मंदिरातील अनागोंदी आणि गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमातील अधिकाराचा वापर करीत राज्य शासनाने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांची सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था म्हणून घोषणा केलीत्न यामुळे मंदिराचा संपूर्ण कारभार आता सरकारच्या नियंत्रणाखाली आला असून, राज्यातील पंढरपूर, शिर्डी, कोल्हापूर या मंदिराप्रमाणे तुळजाभवानी मंदिराचाही कारभार राज्य सरकारच्या नियमावलीनुसार चालणार आहे. राज्य सरकारच्या या अधिसूचनेला तुळजापूरच्या पुजारी मंडळाचे युवराज पाटील व इतरांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. अधिसूचनेला अंतरिम स्थगिती द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. याबाबतची सुनावणी न्या. संजय गंगापूरवाला व न्या. ए. आय. एस. चिमा यांच्या न्यायालयासमोर सुरू असून, या अधिसूचनेला अंतरिम स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. (प्रतिनिधी)समितीनेच कारभार पाहावाजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार या शासकीय अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या समितीनेच मंदिराचा कारभार करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. प्रतिवादींना नोटीस बजावून विधी व न्याय विभागाचे सचिव यांना शपथपत्र सादर करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.