शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदाराला जिल्हा दूध संघाने काळ्या यादीत टाकावे, जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या बैठकीत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 12:33 IST

डीपफ्रीजच्या विषयावरून नाराजी

ठळक मुद्देसेवा देण्यात खाजगी व्यापारी पुढे३ अधिका-यांनी दिला राजीनामा

जळगाव : जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या मासिक सभेत डीपफ्रीजमधील त्रुटीबाबत वारंवार सूचना देऊन सबंधीत ठेकेदारास व अधिकाऱ्यास पाठीशी घालण्यात येत असल्याच्या कारणावरून संचालक चिमणराव पाटील यांच्यासह काही संचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधीत ठेकेदारास काळ्या यादीत टाका अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.चिमणराव पाटील संतापात निघून गेलेजिल्हा दूध उत्पादक संघाची मासिक सभा चेअरमन मंदाकिनी खडसे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दुपारी झाली. बैठकीत संघाने खरेदी केलेल्या डीप फ्रीजरचा विषय चर्चेत आला असता त्यातील त्रुटीबाबत चिमणराव पाटील यांनी प्रश्न उपस्थित करून या विषयावर मागील बैठकीत चर्चा करून दखल घेतली गेली नाही. त्यामुळे दूध संघाचे नुकसान होत असल्याची भूमिका व्यक्त केली. ठेकेदाराला पाठीशी घातले जात असल्याचे सांगून त्याला काळ्या यादीत टाकले जावे अशा सूचना त्यांनी केल्या. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला.जळगावात खाजगी दूध डेअरी चालकांचे आव्हानदूध विक्रीत स्पर्धा वाढली आहे. खाजगी दूध डेअरी चालकांनी दूध संघापुढे आव्हान उभे केले आहे. दूध संघालाही या स्पर्धेत उतरावे लागेल व त्या दृष्टीने नियोजन व्हावे अशी अपेक्षा बैठकीत आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केली. ग्राहकांना घरापर्यंत सेवा दिली पाहीजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. संचालक एल.डी. चौधरी दूध उत्पादक संस्थाच्या सोयी सुुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची भूमिका मांडत त्या उपलब्ध करून द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. यासह विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली.३ अधिका-यांनी दिला राजीनामाजिल्हा दूध संघात कंत्राटी कर्मचाºयांची संख्या वाढली असून राजकारणही वाढल्याची टीका काही संचालकांनी केली. ३ मोठ्या पदावरील अधिकाºयांनी कंटाळून नोकरीचा राजीनामा दिला आहे. याबाबतही काही संचालकांनी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.बैठकीस आपण उपस्थित होतो. जिल्हा बॅँकेत काही कामे असल्यामुळे आपण चर्चा करून निघून गेलो. कोणताही वाद झाला नाही.- चिमणराव पाटील, संचालक, दूध संघ.

टॅग्स :milkदूधJalgaonजळगाव