शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वाक्षरी न दिल्याने कंत्राटदाराने अभियंत्यावर फेकली फाईल, मनपात गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 12:43 IST

काम झाल्यावरही स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ

जळगाव : मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीतून गोपाळपुरा भागातील नाल्याच्या पुलाचे काम होवून महिना झाल्यावरही बिलावर स्वाक्षरी होत नसल्याने, गुरुवारी मनपात शासकीय कंत्राटदार राहुल धांडे व शहर अभियंता डी.एस.खडके यांच्यात वाद झाला. स्वाक्षरीसाठी तब्बल २ तास बसवून ठेवल्यामुळे धांडे यांनी संतापात शहर अभियंत्यांवर फाईल फेकून दिली. त्यानंतर मनपा अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यावर हा वाद शांत मिटविण्यात आला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला २५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यातून शहरात तीन महिन्यांपासून कामे सुरु झाले आहेत. त्यातून गोपाळपुरा भागातील नाल्यालगत असलेल्या पुलाचे काम शासकीय कंत्राटदार राहुल धांडे यांनी घेतले होते. हे काम होवून एक महिना झााल्याची माहिती कंत्राटदार धांडे यांनी दिली. त्या कामाच्या साडे सात लाख रुपयाच्या बिलावर शहर अभियंत्यांची स्वाक्षरी आवश्यक असल्याने धांडे गुरुवारी शहर अभियंत्यांचा कार्यालयात दुपारी १ वाजेच्या सुमारास गेले. मात्र, शहर अभियंत्यांनी सायंकाळी स्वाक्षरी करु असे सांगितले. धांडे यांनी आपल्याकडे शुक्रवारी लग्न असल्याने स्वाक्षरी आताच करावी अशी विनंती केली. मात्र, स्वाक्षरी देण्यास खडके यांनी नकार दिला.पायºयांवर झाला शाब्दिक वादस्वाक्षरी न देताच शहर अभियंते डी.एस.खडके हे आपल्या कार्यालयातून बाहेर आले. धांडे यांनी त्यांचा पाठलाग करून नवव्या मजल्यावरील पायºयांवर येवून स्वाक्षरी करण्याची विनंती केली. त्यावर खडके यांनी फाईल आपल्या दालनात ठेवा अशा सूचना धांडे यांना दिल्या. त्यामुळे धांडे यांनी संताप व्यक्त करत आजच स्वाक्षरी करा असे सांगितले. मात्र, खडके यांनी नकार दिल्यामुळे धांडे यांनी आपल्या हातातील फाईली व कागदपत्रे खडके यांच्या दिशेने फेकली. त्यानंतर शहर अभियंते सुनील भोळे व मनपाच्या काही अधिकाºयांनी धांडे यांची समजूत घालत हा वाद शांत केला.कंत्राटदार धांडे हे याआधी दोन वेळा बिलांवर स्वाक्षरी घेण्यास आले होते व दोन्हीही वेळा त्यांच्या बिलांवर स्वाक्षरी केली आहे. गुरुवारी देखील त्यांनी बिले आणल्यानंतर त्यांना बिलांची फाईल टेबलवर ठेवण्यास सांगितली व सायंकाळी स्वाक्षरी करण्याचे त्यांना सांगितले. मात्र, त्यांनी काहीही ऐकून न घेता वाद घातला.-डी.एस.खडके, शहर अभियंता, मनपामहिनाभरापासून नाल्यावरील पुलाचे काम झाले आहे. शुक्रवारी बहिणीचे लग्न असल्याने पैशांची गरज असल्याने शहर अभियंत्यांकडून बिलांवर स्वाक्षरी करण्याची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे. काही बिलांवर आयुक्तांच्या स्वाक्षरीची गरज होती. आयुक्तांनी एका मिनीटात बिलांवर स्वाक्षरी केली. मात्र, शहर अभियंता स्वाक्षरी देण्यास टाळाटाळ करत आहेत.-राहुल धांडे, कंत्राटदार

टॅग्स :Jalgaonजळगाव