नांदेड, ता.धरणगाव : नांदेडसह परिसरात झालेल्या सततच्या पावसाचा फटका उन्हाळ्यात मे महिन्यात लावणी केलेल्या बागायती कपाशीचा पिकांनाही बसला आहे. कपाशीच्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीच साचून पीक धोक्यात आले आहे.
नांदेडसह जवळपासच्या गावांमधील शेती शिवारातही हीच स्थिती असल्याचे दिसून आहे. परिणामी, बागायती कपाशीचे पीक बऱ्यापैकी असताना, सततच्या पावसामुळे पिकावर रोगराईचा प्रार्दुभाव दिसत आहे. कपाशीच्या कैऱ्यांवरही काळपट डाग पडले आहेत. कैऱ्या सडण्याच्या मार्गावर आहेत.
पिकांमध्ये पाणी असून, शेतातील चिखलामध्ये पाय खोलवर रुतत असल्याने कीटकनाशकांची फवारणीही शेतकऱ्यांना करता येत नाही. दिवसभर कडक ऊन पडून पावसाची उघडीप होऊन सामसूम राहत असली, तरी सायंकाळनंतर पावसाची धामधूम सुरू होते.
120921\20210912_085144.jpg
नांदेड शेतीशिवारात बागायती कपाशीच्या पीकांमध्ये पाणी साचून पीक वाया जाण्याच्या मार्गावर आहे -छाया -राजेंद्र रडे