शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

सततच्या चो:यांमुळे बोदवडला व्यापारी संतप्त

By admin | Updated: January 5, 2016 01:10 IST

बोदवड : गत महिनाभरापासून बंद असलेल्या चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले आहे. शहरासह नाडगावात दुकान फोडीची घटना घडली. सततच्या चो:यांमुळे मोठे नुकसान होत आहे.

बोदवड : गत महिनाभरापासून बंद असलेल्या चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले आहे. शहरासह नाडगावात दुकान फोडीची घटना घडली. सततच्या चो:यांमुळे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी प्रचंड संतप्त झाले.त्यांनी थेट पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून रोष व्यक्त केला.

दरम्यान, गेल्या 16 नोव्हेंबर रोजी येथील व्यापारी संघटनांनी वाढत्या चोरीच्या घटनांना त्रस्त होऊन बोदवड शहर बंद केले होते. रिझल्ट देऊ असे सांगत पोलीस प्रशासनाने व्यापा:यांना आश्वासन दिले होते. परंतु चोरी व चोरीचा तपास तर लागला नाही. परंतु महिनाभरानंतर चोर पुन्हा सक्रिय झाले. त्यांनी शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या गौरीशंकर कॉम्प्लेक्समधील मयूर मोबाइल या दुकानाला लक्ष करीत दुकानाच्या शटरची दोन्ही कुलूपे तोडून दुकानातून विविध कंपन्यांचे एक लाख रुपये किमतीचे 27 अॅण्ड्राईड मोबाइल, मेमरीकार्ड व रोख दीड हजार असे एकूण एक लाख 20 हजार रुपयांचे मोबाइल साहित्य लंपास केले. या चोरीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या मोबाइल दुकानाशेजारीच नवकार मोबाइल हे दुकानही फोडण्याचा प्रयत्न चोरटय़ांनी केला आहे. परंतु सुदैवाने लॉक तोडण्यात त्यांना अपयश आल्याने हे दुकान वाचले. अन्यथा या दुकानातसुद्धा दोन लाख रुपयांचे संगणक, मोबाइलचे साहित्य होते. विशेष म्हणजे स्टेट बँक कार्यालयाच्या खालील बाजूस मयूर मोबाइलचे दुकान आहे. वरील भागात बँकेचे एटीएमसुद्धा आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी वॉचमनही नेमण्यात आला आहे.

वॉचमन समोरच झोपलेला होता. त्यामुळे त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी करून त्याला सोडून दिले.

व्यापा:यांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

मयूर मोबाइलचे दुकान फुटल्याची चर्चा शहरात समजातच संपूर्ण व्यापा:यांनी गोळा होत बोदवड पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला व पोलीस निरीक्षक श्रीकांत घुमरे यांना चोरीचा तपास तत्काळ करावा, ही मागणी केली. संतापात व्यापा:यांनी भावना ही मांडल्या.

व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाळ अग्रवाल, किरण मोरे, आनंद गुप्ता,, धीरज जैन, नरेश आहुजा, दीपक झांबड, राधेश्याम अग्रवाल, परेश अग्रवाल, बंडू पोळ, राकेश खत्री, प्रशांत चोपडा, अमित जैन, स्वप्नील जैस्वाल, संजय बडगुजर आदी व्यापारी सहभागी होते.

अधीक्षकांकडे दाद मागणार

चोरीबाबत पोलीस ठाण्यात मोर्चा नेण्यात आल्यावर व्यापा:यांनी आम्हाला वारंवार निवेदन देऊनही सुरक्षा व चोरीच्या घटनांना आळा घालण्यात पोलिसांना अपयश येत असेल तर शेवटी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दाद मागू असा सूर व्यापारी वर्गातून उमटत आहे. (वार्ताहर)