शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

फैजपूर प्रांत कार्यालयात डिजीटल स्वाक्षरीचे दाखले देणे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:45 IST

फैजपूर येथे उपविभागीय कार्यालयातून देण्यात येत असलेले शैक्षणिक व जातीचे दाखले डिजिटल स्वरुपात वाटप करण्यात येत आहे. यात प्रांताधिकाऱ्यांची डिजीटल स्वाक्षरी मिळणाºया दाखल्यावर असणार आहे.

ठळक मुद्देमूळ कागदपत्रानेच निघणार दाखलेनागरिकांचा वेळ, पैसा आणि दलालांपासून होणार सुटका

फैजपूर, जि.जळगाव : फैजपूर येथे उपविभागीय कार्यालयातून देण्यात येत असलेले शैक्षणिक व जातीचे दाखले डिजिटल स्वरुपात वाटप करण्यात येत आहे. यात प्रांताधिकाऱ्यांची डिजीटल स्वाक्षरी मिळणाºया दाखल्यावर असणार आहे. फैजपूर प्रांत कार्यालयात आॅनलाईन सुविधा ही १२ आॅक्टोबरपासून सुरू झाली आहे. आतापर्र्यंत प्रांत कार्यालयातून डिजिटल स्वाक्षरीचे ११० दाखल्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी दिली.पूर्वी नागरिकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दाखल्यासाठी पालकांना दलालांमार्फत नॉन क्रिमिलर, जातीचा दाखला, डोमीसाइल व इतर दाखले जास्तीचे पैसे देवून मिळवत होते. दाखले घेण्यासाठी शासकीय फीच्या व्यतिरिक्त दलालांकडून जादा पैसे मोजावे लागत होते पण या आॅनलाईन डिजिटल् मुळे ५५ ते ७५ रुपयात आता दाखले मिळणार आहेत. यात पूर्वी पंधरा दिवसात दाखले मिळत होते आता तेच दाखले काही तासातच नागरिकांना उपलब्ध होत आहे आतापर्यंत फैजपूर प्रांत कायार्लायातून ११० दाखल्याचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि दलालांपासून सुटका होणार आहे. आॅनलाईन डीजीटल दाखले करण्यसाठी फैजपूर उपविभागाचे प्रांतधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी सप्टेंबर महिन्यात यावल रावेर तालुक्यातील सेतू सुविधा केंद्र प्रमुख यांची संयुक्त बैठक बोलवण्यात आली होती. त्यात डॉ थोरबोले यांनी आॅनलाईन डिजिटल स्वाक्षरीसंदर्भात सविस्तर माहिती दिली होती.जातीच्या दाखल्यासाठी पूर्वी झेरॉक्स कागदपत्रे जोडल्यानंतर जातीचे दाखले मिळत होते. पण आता आॅनलाईन डिजिटल झाल्यामुळे मूळ कागदपत्र जोडावी लागणार आहे. दाखल्यांचे प्रकरण दाखल केल्यानंतर संबधित व्यक्तींना त्यांचे मूळ कागदपत्र परत मिळणार आहे. त्यामुळे झेरॉक्स प्रत आता जोडता येणार नाही. 

टॅग्स :GovernmentसरकारFaizpurफैजपूर