शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या समांतर रस्त्यांच्या कामांचा डीपीआर तयार करण्यासाठी नेमणार कन्सल्टंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 15:38 IST

१०० कोटीतून करावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरविणार

ठळक मुद्दे १०० कोटीतून करावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरविणारजुन्या महामार्गांसाठी दिलाय शासनाने निधी

जळगाव: शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या समांतर रस्ते तसेच उड्डाणपूल, भुयारी मार्ग आदींची १०० कोटीच्या निधीत बसू शकतील अशा कामांचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार करण्यासाठी कन्सल्टंटची नेमणूक केली जाणार असून त्यानंतर निविदा प्रक्रिया करून हे काम मार्गी लावले जाणार असल्याची माहिती ‘नही’च्या अधिकाºयांनी ‘लोकमत’ला दिली.शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.६ चे समांतर रस्ते विकसित केलेले नसल्याने नागरिकांना महामार्गावरूनच वापर करावा लागत असल्याने मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन निरपराध लोकांचा बळी जात आहे. त्यासाठी समांतर रस्ते कृती समितीने ‘नही’ला प्राप्त १०० कोटीच्या निधीतून समांतर रस्त्यांचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी करीत १० जानेवारी रोजी रास्ता रोकोचा इशारा दिला आहे. त्यावर जिल्हाधिकाºयांनी ‘नही’ला प्राप्त निधी हा यापूर्वी पाठविलेल्या ४२४ कोटींच्या डीपीआरच्या तुलनेत कमी असल्याने या निधीतून कोणती कामे प्राधान्याने करावयाची ते प्रत्यक्ष पाहणी करून ठरवावे लागणार असल्याने त्यानुसार डीपीआर केला जाणार असल्याचे सांगितले.कन्सल्टंटची करणार नेमणूक१०० कोटींच्या निधीतून कामे कधी होणार? याबाबत ‘नही’च्या अधिकाºयांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कोणती कामे प्राधान्याने करावयाची ते पाहणी करून ठरवून सविस्तर प्रकल्प अहवाल नव्याने तयार करावा लागणार आहे. त्यासाठी कन्सल्टंटची (सल्लागार कंपनी) नेमणूक केली जाणार आहे. या कन्सल्टंटकडून डीपीआर प्राप्त झाल्यावर निविदा प्रक्रिया करून कामांना सुरूवात केली जाईल. त्यात निविदा प्रक्रियेला किती वेळ लागतो? त्यावर या कामांना सुरूवात होण्याचा कालावधी ठरणार आहे.जुन्या महामार्गांसाठी दिलाय शासनाने निधीकेंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाने ज्या महामार्गांंच्या जागी पर्यायी वळण रस्ते बांधण्यात येत आहेत. त्या जुन्या महामार्गांचे रूंदीकरण, बळकटीकरण करण्यासाठी देशभरातील ८१ ठिकाणच्या महामार्गाच्या बळकटीकरणासाठी  ४ हजार ६७१ कोटी ३२ लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यात जळगाव शहरातून जाणाºया महामार्गासाठी १०० कोटींच्या निधीचा समावेश आहे. कोणतेही भूसंपादन न करता आहे त्या जागेतच ही कामे करावयाची आहेत.

समांतर रस्त्यांसह ही कामे करणे शक्यशहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.६च्या १६.८६ किमी लांबीच्या मार्गाचा विकास करण्यासाठी १०० कोटीचा निधी शासनाने मंजूर केला आहे. त्यात समांतर रस्ते विकसित करणे, उपलब्ध जागेतच महामार्गाची रूंदी वाढविणे तसेच मजबुतीकरण करणे, महामार्गालगतच्या सांडपाण्याचे व्यवस्थापन करून महामार्गाचे आयुष्य वाढविणे आदी कामे करण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार महामार्गासाठी ‘नही’च्याच ताब्यात असलेल्या ६० मीटर जागेत महामार्गालगत समांतर रस्ते विकसित करणे, तसेच उड्डाणपूल उभारणे, अंडरपास-वे करणे आदी कामे प्रस्तावित केली जाणार आहेत.

मनपाकडून ले-आऊटमधील रस्त्यांचाही विकास नाहीनहीचे प्रकल्पसंचालक अरविंद काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, सध्या जे समांतर रस्ते असल्याचे सांगितले जात आहेत, ते रस्ते मनपाच्या मंजूर ले-आऊटमधील आहे. मनपाने ले-आऊट मंजूर करताना त्यासाठी विकासकाकडून पैसे घेतले आहेत. त्यामुळे मनपानेच ते रस्ते विकसित करणे आवश्यक होते. मात्र मनपाने त्या रस्त्यांचा विकास केला नाही व हे रस्ते ‘नही’चे असल्याचा चुकीचा दावा केला जात आहे. शहरातून जाणाºया महामार्गाचीच सुमारे ६० मीटरची जागा केंद्र शासनाच्या ताब्यात आहे. त्यामुळे त्या जागेतून आता समांतर रस्ते तयार करून विकसित केले जातील.