भुसावळ: बाजारपेठ पोलिस ठाण्यासमोर रेल्वे लोखंडी बोगद्याच्या पुढे सुरू असलेल्या बांधकामासाठी पाण्याची नळी निष्काळजीपणे रस्त्यावरच सोडल्यामुळे संपूर्ण पाणी लोखंडी पुलाखाली साचल्याने जणू तळे साचले. यामुळे पायी जाणाऱ्यांसह वाहनचालकांची गैरसोय झाली.लोखंडी पुलापुढे यावल रोडवर जनरल स्टोअरच्या बाजूला सुरू असलेल्या बांधकामासाठी पाण्याचा वापर करताना चक्क नळी भररस्त्यावर सोडून देण्यात आली. तासंतास पाणी वाहिल्याने पाण्याचा मोठा प्रमाणात अपव्ययही झाला. मात्र संबंधितानी नळ बंद करण्याची तसदी सुद्धा घेतली नव्हती. यामुळे संबंधितावर कारवाईची मागणी होत आहे.
बांधकामाचे पाणी रस्त्यावर, पुलाखाली साचले तळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 21:11 IST