शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

महामार्गाच्या मजबुतीकरणाचे काम रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 12:06 IST

साडेबारा कोटींचे होते काम

ठळक मुद्दे महामार्गावरील समांतर रस्त्याच्या कामामुळे निर्णय

जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या मजबुतीकरणाची निविदा अंतिम टप्प्यात असताना ती स्थगित करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. समांतर रस्त्याच्या कामांच्या निविदेमुळे हे काम न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.शहरातून जाणाºया महामार्गावरून प्रचंड रहदारी सुरू असते. गेल्या काही वर्षात महामार्गाच्या पलिकडे अनेक उपनगरे वसल्याने महामार्ग ओलांडून येण्याशिवाय नागरिकांना पर्याय नाही. त्यातच अनेक मोठ्या शैक्षणिक संस्थाही महामार्गालगत किंवा पलिकडे आहेत. हजारो नागरिक यात लहान मोठी मुले, महिला, पुरूष जात - येत असतात.रस्त्याची झाली चाळणीपावसाळ्यानंतर महामार्गाची अक्षरश: चाळणी झाल्याची परिस्थिती आहे. लहान मोठे खड्डे, साईडपट्टया खोल गेलेल्या अशा परिस्थितीमुळे रदहारी व वाहने एकमेकांना ओव्हरटेक करून जाणे या प्रकाराने बºयाच वेळेस या मार्गावर अपघात झाले आहेत. वाढते अपघात लक्षात घेऊन काही स्वयंसेवी संस्थांनी आंदोलनेही केली. पालकमंत्री चंद्रकात पाटील हे जिल्हा दौºयावर आले असताना नागरिकांनी त्यांची भेट घेतली होती.पालकमंत्र्यांचे होते आश्वासनशहरातून जाणाºया समांतर रस्त्याचे कामाला बरीच प्रक्रिया बाकी असल्यामुळे व साधी निविदाही त्यावेळी निघाली नसल्याने या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यासाठी व साईडपट्ट्यांचे काम करून घेण्यासाठी तात्काळ निविदा काढण्याचे आदेश दिले होते. मात्र ती प्रक्रियाही बरीच लांबली.स्थानिक स्वयंसेवी संस्था व लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा केल्यानंतर या निविदा प्रक्रियेला गती प्राप्त झाली.अखेर १२ कोटींची निविदा प्रसिद्धपालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाला अखेर मुहूर्त लाभला. १३ डिसेंबरला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या स्वाक्षरीने निविदा प्रसिद्ध झाली. १२ कोटी ४० लाख तीन हजार ५९ रूपयांच्या कामांची ही निविदा होती. निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर बरीच प्रक्रियाही आटोपली होती.समांतर रस्त्याच्या निविदेमुळे थांबली प्रक्रियाप्रचंड जनरेटा व स्वयंसेवी संस्थांच्या पाठपुराव्यानंतर समांतर रस्त्याच्या कामांची निविदा गेल्या महिन्यात प्रसिद्ध झाली. शहरातून जाणाºया महार्गासह समांतर रस्त्यांचे चौपदरीकरण व अन्य कामे प्रस्तावित करून जवळपास ७० कोटींच्या कामांची निविदा २० डिसेंबरला प्रसिद्ध झाली. त्यामुळेच महामार्ग दुरूस्तीची निविदा प्रक्रिया स्थगित करण्यात आली.असे होणार होते काम... १२ कोटी ४० लाखाच्या या निधीतून शहरातून जाणाºया महामार्गावरील महामार्ग क्रमांक सहा धुळ्याकडे जाणाºया मार्गावरील गिरणा पुलापासून ते भुसावळ रोडवरील गौरव हॉटेलपर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण, साईडपट्ट्या भरणे असे काम प्रस्तावित होते. ४ जानेवारीपर्यंत ई निविदा सादर करण्याची अंतिम तारीख होती. समांतर रस्त्याच्या निविदेमुळे थांबली प्रक्रियाप्रचंड जनरेटा व स्वयंसेवी संस्थांच्या पाठपुराव्यानंतर समांतर रस्त्याच्या कामांची निविदा गेल्या महिन्यात प्रसिद्ध झाली. शहरातून जाणाºया महार्गासह समांतर रस्त्यांचे चौपदरीकरण व अन्य कामे प्रस्तावित करून जवळपास ७० कोटींच्या कामांची निविदा २० डिसेंबरला प्रसिद्ध झाली. त्यामुळेच महामार्ग दुरूस्तीची निविदा प्रक्रिया स्थगित करण्यात आली.असे होणार होते काम... १२ कोटी ४० लाखाच्या या निधीतून शहरातून जाणाºया महामार्गावरील महामार्ग क्रमांक सहा धुळ्याकडे जाणाºया मार्गावरील गिरणा पुलापासून ते भुसावळ रोडवरील गौरव हॉटेलपर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण, साईडपट्ट्या भरणे असे काम प्रस्तावित होते. ४ जानेवारीपर्यंत ई निविदा सादर करण्याची अंतिम तारीख होती.