शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांसाठी ५५ हजार घरांचे बांधकाम : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 17:55 IST

भुसावळ येथे पोलीस उपअधीक्षक कार्यालय, तालुका पोलीस स्टेशनच्या प्रशासकीय इमारतीचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले.

ठळक मुद्देगुन्हेगारांना शिक्षेचे प्रमाण ९ वरून ४२ टक्क्यांवरपोलिसांनी जनतेसोबत माणुसकीने वागण्याचा सल्ला४.२५ कोटी रकमेची इमारत राहिली एक वर्षात उभी

आॅनलाईन लोकमतभुसावळ,दि.१४ - पोलिसांसाठी राज्यात ५५ हजार घरांचे बांधकाम सुरू असल्याची माहिती महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम आणि  जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी भुसावळात दिली.महाराष्टÑ राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळातर्फे बांधण्यात आलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जलसंपदा व वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन होते. प्रमुख म्हणून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे उपस्थित होते.चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले तीन वर्षापूर्वी  गुन्हेगारांना शिक्षेचे प्रमाण ८ ते ९ टक्के होते. ते आता तीन वर्षांपासून ४२ टक्यांवर आले आहे. त्यामुळे  गुन्हेगारांवर नियंत्रण मिळविता आले आहे.पोलिसांनी तक्रार येताच गुन्ह्याची नोंद करुन त्याचा तपास तप्तरतेने करायला हवा.पोलीस ठाण्यात आलेल्यांना चांगली वागणूक द्या.माणुसकी जपा असा सल्ला त्यांनी दिला. चांगल्या माणसांना अभय व गुन्हेगारांवर वचक  राहायला हवा,अशी भूमिका त्यांनी मांडली.जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराडे यांनी प्रास्तावि केले. एक वर्षाच्या काळात इमारत उभी राहीली. बांधकामासाठी ४.२५ कोटी रुपये खर्च आला. इमारतीसाठी अडीच हेक्टर जागा आहे. १५ हजार स्क्वे.फुटवर बांधकाम करण्यात आले आहे. पोलिसांची जबाबदारी वाढली आहे. इमारतीला साजेसे काम करावे लागेल. कार्पोरेट सर्व्हिस द्यावी लागेल, असे ते म्हणाले. तू आणि मी हे सोडून आम्ही सर्व जण मिळून चांगला समाज घडवू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी जनजागृतीसाठी शहरासह जिल्हा भरातील गणेश मंडळांना अडीच हजार आॅडीओ सीडींचे वाटप करण्यात आले.