शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्याला दिलासा.... १७ कोरोनामुक्त, ५९ जण निगेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 12:48 IST

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाना रविवारी जळगाव जिल्ह्याला दिलासा मिळाला. सकाळी अमळनेरात १७ रुग्णांना ...

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाना रविवारी जळगाव जिल्ह्याला दिलासा मिळाला. सकाळी अमळनेरात १७ रुग्णांना दहा दिवसाच्या नियमानुसार लक्षणे नसल्याने घरी सोडण्यत आले आहे़ यासह जळगावच्या कोरोना रुग्णालयातूनही दोन रुग्णांना घरी सोडण्याची प्रक्रिया सुरू होती़ दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा ५९ अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटीव्ह आले आहेत़ त्यामुळे या दोनही घटना जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरल्या.अमळनेरला बे्रेक, जळगाव, भुसावळ सुसाटजिल्ह्यात सर्वात मोठे हॉटस्पॉट असलेल्या अमळनेरात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून दिलासा मिळत असताना जळगाव व भुसावळात मात्र, वेगाने रुग्ण संख्या वाढत आहे़ केवळ तीन चार तालुक्यांमध्येच तीन दिवसात ४७ रुग्णांची वाढ झालेली आहे़ यात भडगाव व धरणगाव या नवीन तालुक्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे़ अशी परिस्थिती असताना जळगाव शहरात मात्र लॉकडाऊनचे गांभीर्याने पालन होत नसल्याचे चित्र आहे़५९ अहवाल निगेटीव्ह, भडगावात दिलासाभडगावच्या बाधित रुग्णांच्या संपर्कातील संशयित रुग्णांपैकी ५९ जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व अहवाल निगेटीव्ह आल्याने भडगावात दिलासा मिळाला आहे़ भडगावातही अचानक दोन ते तीन दिवसातच रुग्ण संख्या ८ वर पोहचलेली आहे़अमळनेरात सकारात्मक बदलजिल्हाभरातील २५७ रुग्णांमध्ये १०५ रुग्ण हे एकट्या अमळनेर येथील आहे़ अमळनेरात एक ते शंभर रुग्ण होण्यासाठी केवळ दोन आठवड्यांचा अवधी लागला होता़ मात्र,एका आठवड्यात अमळनेरात आता केवळ तीन रुग्ण आढळून आले आहेत. शिवाय बरे होणाऱ्यांची संख्याही ४७ वर पोहचलेली आहे़ त्यामुळे अमळनेरात एक दिलासादायक बदल समोर येत आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव