शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक दृष्टिकोनातून व्हावी सातत्यपूर्ण वाटचाल- विवेक गोसावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 17:20 IST

संकटाच्याच नव्हे तर कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोनातून सातत्यपूर्ण वाटचाल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी केले.

ठळक मुद्देबालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांचे प्रतिपादनआॅनलाईन संवाद सत्राच्या समारोपात सांगितली पाठ्यपुस्तक निर्मिती व वितरणाची वाटचाल

भुसावळ : कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात प्रचंड बदल होत आहे. आॅनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. त्यासाठी माध्यम म्हणून पाठ्यपुस्तकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. ही पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत लवकरात लवकर कशी पोहोचतील यासाठी निर्मिती प्रक्रियेतील सर्वच घटकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याने वेळेच्या आत विद्यार्थ्यांपर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचू शकली. त्यामुळे संकटाच्याच नव्हे तर कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोनातून सातत्यपूर्ण वाटचाल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी केले.बारावी युवकभारती मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित बारावी युवकभारती मराठी पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी यांच्याशी आॅनलाईन संवाद या उपक्रमाच्या समारोपप्रसंगी गोसावी बोलत होते.प्रारंभी डॉ.जगदीश पाटील यांनी गेल्या चार दिवसात हिरा बनसोडे, डॉ.प्रतिमा इंगोले, कल्पना दुधाळ, अनुराधा प्रभुदेसाई या लेखक-कवींनी शिक्षकांशी आॅनलाईन संवाद साधल्याचे सांगितले. तसेच वयाच्या ३४व्या वर्षी निर्मिती नियंत्रक या पदावर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या गोसावी यांनी आतापर्यंतच्या आपल्या १२ वर्षांच्या कारकीर्दीत नेतृत्वगुण, कर्तबगारी व कल्पकता यांची वेळोवेळी चुणूक दाखवली असल्याचेही परिचयातून सांगितले.मराठी भाषा तज्ज्ञ समितीच्या डॉ.माधुरी जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. आॅनलाईन संवाद सत्राच्या समारोपात महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक मोठ्यव संख्येने सहभागी झाले होते. 

टॅग्स :marathiमराठीBhusawalभुसावळ