शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

संतांचे संगति, मनोमार्ग गति ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 12:11 IST

मनुष्य जन्मात परमेश्वराच्या प्राप्तीचा एकमेव सुलभ उपाय सत्संग हाच आहे, असे अनेक संतांनी वर्णन केले आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात- ...

मनुष्य जन्मात परमेश्वराच्या प्राप्तीचा एकमेव सुलभ उपाय सत्संग हाच आहे, असे अनेक संतांनी वर्णन केले आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात- संतांचे संगति मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे संत एकनाथ महाराज म्हणतात. हरि प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पारय । येणे साधती साधने तुटती भवाचि बंधने । संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देतो ग्वाही । एका जनदिनी संत । पूर्ण करीती मनोरक्ष संत रामदास यांच्या भाषेत सांगायचे झाले तर.सत्संगतिचा महिमा कळेना ।सत्संग कोठे श्रमल्या मिळेना ।।सत्संगतीने तुटली कुबुद्धी ।सत्संग झाल्या बहुसाल सिद्धी ।।मनुष्याच्या कल्याणाकरिता सर्वांत महत्त्वाची व पहिली गोष्ट म्हणजे त्याला ह्या गोष्टीची जाणीव पाहिजे किंवा त्याला ह्या गोष्टीचे ज्ञान व्हावयास पाहिजे की,कोण मी कुठला कोठूनी आलो ?कुठे जावयाचे मला ।मनुष्याने असा विचार केला पाहिजे की, मला काय करावयाचे होते व मी काय करीत आहे. मनुष्य जीवन सर्वात श्रेष्ठ का आहे. मनुष्य जीवनात आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार करणे हेच ह्या जीवनाचे परम ईप्सित आहे. आत्मसुख कशात आहे. ह्या आत्म्याचा असलेला जगाशी संबंध कशा प्रकारचा आहे. गुरू कोणाला म्हणतात आणि मनुष्याला गुरू करणे कसे अनिवार्य आहे. सर्व गोष्टींचे एकमेव उत्तर म्हणजे ‘सत्संग’ करणे हे होय. वरील सर्व प्रश्नांचे निराकरण सत्संग केल्याने आपोआप पूर्ण होत जातात. ह्यासाठी चारवेद, अठरा पुराणे, सहाशास्त्रे यांनी सुद्धा गर्जुन गर्जुन पुन: पुन्हा हे आणि हेच सांगितले आहे की, सत्संग करा कारण ईश्वर प्राप्ती करण्यासाठी सत्संग हीच पहिली पायरी आहे.‘सत्संग’ या शब्दाची सत् = सत्य हाच मुख्य आशय अथवा उद्देश आहे. बहुतेक वेळी बरीच माणसं सत्संग फक्त मनोरंजनासाठीच करतात; पण मनोरंजन करणे म्हणजे सत्संग नव्हे हा सत्संगाचा भावार्थ नाही. सत्संगाचा सत्संग करण्याचा महत्त्वाचा हेतू म्हणजे आत्म्याची उन्नती किंवा कल्याण व आत्म्याचे परमात्म्यात विलीनीकरण आहे. जी माणसे मनोरंजन करण्याच्या हेतूने सत्संग करतात व ज्यांची विचारधारणा फक्त गोडगाणे ऐकणे व मधुर वादन ऐकण्याची असते.पण सत्संगाच्या मुख्य हेतूबद्दल ज्यांना आवड नसते अश्या व्यक्तींना सत्संगाचा परिपूर्ण लाभ प्राप्त होत नाही.- दादा महाराज जोशी, जळगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव